शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा सकाळी दात न घासताच शपथविधीला गेले होते, कारण..; शिंदे गटाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 16:30 IST

जर आमची गद्दारी होती तर काँग्रेससोबत शरद पवारांनी केलेली गद्दारी नव्हती का? असा सवाल शिंदे गटाने अजित पवारांना विचारला आहे.

पुणे - अजित पवारांची टीका म्हणजे स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी परिस्थिती अजितदादांची झाली आहे. अजितदादा २३ नोव्हेंबरच्या पहाटेच्या शपथविधीसाठी दात न घासताच गेले होते कारण त्यांना घाई होती असं एका राष्ट्रवादी नेत्यानेच मला सांगितले. त्यांनी जो उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी केला ती गद्दारी होती की शरद पवारांविरोधात उठाव होता असा प्रश्न शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांना विचारला आहे. 

नरेश म्हस्के म्हणाले की, ज्यावेळी अजित पवार यांनी शपथविधी केला तेव्हा जे स्वत:ला पवारांचे पुत्र म्हणतात त्यांनी आम्हाला फोन करून अजितदादांचे पुतळे जाळा असा फोन केला होता. राष्ट्रवादीच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनीही पुतळेही जाळले होते. मग अजित पवारांनी जो प्रकार केला होता त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांचे पुतळे जाळले का? आपण काय केलंत? पहाटेचा शपथविधी केला त्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी करणं गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत १० जून १९९९ राष्ट्रवादी पक्षाची स्थापना, आम्ही काँग्रेसपासून वेगळे आहोत असं पवारांनी पत्र लिहिलं होते. ती गद्दारी नव्हती का?, जर आमची गद्दारी होती तर काँग्रेससोबत शरद पवारांनी केलेली गद्दारी नव्हती का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या विचारांवर पक्ष वाढवला. मुळात शिवसेना संपवण्याचं काम संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राष्ट्रवादीने केले आहे. ग्रामीण भागात शिवसैनिकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात लढून पक्ष वाढवला. त्या शिवसैनिकांना संपवण्याचं काम राष्ट्रवादीनं केले. त्यामुळे शिवसेना टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बंड नव्हे तर उठाव केला आहे असंही नरेश म्हस्के म्हणाले. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांची सभा, त्यांची कारकिर्द, लोकांचा प्रतिसाद पाहून संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडलंय. राऊतांचा भोंगा सकाळी सुरू होतो. संजय राऊतांना कोण विचारतंय? फक्त सकाळी भुंकणे हेच राऊत करतात. त्यांनी लोकांसाठी काय केलंय? असा सवाल नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना केला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस