शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-अजितदादांकडून शेतकरी देशोधडीला

By admin | Updated: October 10, 2014 22:58 IST

शालिनीताई पाटील : कोरेगावच्या जनतेचे वाटोळे करणाऱ्यांना हद्दपार करा

सातारा : ‘कोरेगाव, खटाव तालुक्यांतील २७ हजार सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना होता. मात्र, अजित पवार यांनी स्वत:च्या हितासाठी महाराष्ट्र राज्य बँकेच्या माध्यमातून कर्ज थकल्याचे निमित्त केले. आणि जरंडेश्वर कारखान्याची लिलावाद्वारे विक्री करून अजित पवार यांनी कारखाना खरेदी करून आपल्या मालकीचा केला. कारखाना खरेदी करण्यामध्ये अजित पवार यांना आ. शशिकांत शिंदे यांनी सहकार्य केले आहे. शेतकऱ्यांचे व त्यांच्या मुलांचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना हिसका दाखवून काँग्रेसचे उमेदवार विजय कणसे यांच्या पाठीशी राहावे,’ असे आवाहन डॉ. शालिनीताई पाटील यांनी केले आहे.जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कार्यकत्याची गोपनीय बैठक कोरेगाव येथे झाली. यानंतर शालिनीताई पाटील यांनी सांगितले की, १८ वर्षे संघर्ष करून १९९९ मध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू केला. सुरुवातीच्या काळात कारखाना व्यवस्थित सुरू होता. परंतु राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वत:च्या हितासाठी महाराष्ट्र राज्य बँकेच्या माध्यमातून कारखान्याचे कर्ज थकल्याचे निमित्त करून कारखान्याची लिलावाद्वारे विक्री केली. आणि हा कारखाना स्वत: खरेदी केला. २७ हजार सभासदांच्या मालकीचा असणारा हा कारखाना अजित पवारांनी स्वत:च्या मालकीचा करून घेऊन कोरेगाव, खटाव तालुक्यांतील सभासद शेतकरी यांच्यावर फार मोठा अन्याय केला आहे. कारखाना खरेदी करण्यामध्ये अजित पवार यांना आ. शशिकांत शिंदे यांनी सहकार्य केले आहे. शेतकऱ्यांचे व त्यांच्या मुलांचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना हिसका दाखवूनकारखाना गटाचे सर्व संचालक व सभासद कार्यकर्ते यांनी कोरेगाव येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. विजय कणसे यांनी शालिनीताई पाटील यांची समक्ष भेट घेऊन जरंडेश्वर कारखान्याचे, कोर्टामध्ये जे खटले सुरू आहेत, त्यास मदत करत आहेच व इथून पुढेही आमची मदत व सर्वतोपरी सहकार्य करून कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा होऊन कारखान्याचे तसेच सभासदांचे हित जोपासण्याचे काम करू,’ असे सांगितले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, सभासद कार्यकर्ते यांनी विजय कणसे यांना साथ देण्याचा निर्धार केला. (प्रतिनिधी) कारखाना विक्रीत माजी पालकमंत्र्यांचाच हातविद्यमान लोकप्रतिनिधींनी तसेच अजित पवार यांनी सभासद शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कारखाना खरेदी करण्यासाठीच आ. शशिकांत शिंदे यांनीच मदत केली आहे. त्यामुळे स्वहितासाठी काम करणाऱ्या आ. शिंदे यांना आता मतपेटीतून उत्तर देण्याची वेळ आली आहे. तरी सर्वांनी अ‍ॅड. विजय कणसे यांना साथ द्यावी,’ असे आवाहनही शालिनीताई पाटील यांनी कणसे याच्ंयाशी चर्चा झाल्यानंतर केले.