शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना परदेशात जाण्यास परवानगी

By admin | Updated: June 14, 2017 01:06 IST

व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रा यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांना न्यायालयाने देशाबाहेर जाण्यास मनाई

- लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रा यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांना न्यायालयाने देशाबाहेर जाण्यास मनाई केली होती. परंतु नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शेट्टी दाम्पत्यास परदेशात जाण्यास परवानगी दिल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा व भागीदार दिर्शत इंद्रवन शाह, उदय कोठारी यांनी बेस्टडील टीव्ही प्रा. लि. ही आॅनलाइन कंपनी सुरू केली. ग्राहकांकडून बेडशीटची आॅर्डर ते घेत होते. त्यांच्या बेडशीटची आॅर्डर भलोटिया एक्स्पोर्ट कंपनीने जुलै २०१५ ते मार्च २०१६दरम्यान पूर्ण केली. मात्र आॅनलाइन ग्राहकांना बेडशीट विक्र ी करून आलेली २४ लाख १२ हजार ८७७ रु पये भलोटिया एक्स्पोर्ट कंपनीस मिळाली नाही, अशी तक्रार कंपनीचे मालक रवी भलोटिया यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात केली होती. या प्रकरणी राज कुंद्रा व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे न्यायालयातून अंतरिम जामीन मिळवल्यानंतर राज यांनी वकिलासह कोनगाव पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टी, राज यांच्यासह कोठारी यांना ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. खटल्यादरम्यान शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, उदय कोठारी यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास मनाई केली होती. परंतु कामानिमित्ताने तिघांनी परदेशात जाण्यासाठी न्यायालयात अर्ज केला असता ठाणे न्यायालयाने कोठारी यांना परदेशी जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर शिल्पा आणि राज यांच्या अर्जावर ६ जूनला सुनावणी देताना २१ जुलैपर्यंत परदेशात जाण्याची परवानगी दिली.