राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 06:59 IST2026-05-18T06:59:38+5:302026-05-18T06:59:46+5:30

आता शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात प्रत्यक्ष उभे राहून, पिकाचा जिवंत फोटो काढून, अक्षांश-रेखांशासह (जीपीएस लोकेशन) तो ॲपवर अपलोड करावा लागतो.

Seventy million farmers in the state have received Saatbara; Talathya's tour has been released, use of 'e-Peak Pahani' mobile app has increased | राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर

राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर

- बालाजी देवर्जनकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सातबारा आणि पीकपेऱ्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचा बळीराजाचा त्रास आता कायमचा संपला आहे. महसूल व कृषी विभागाच्या ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपने राज्यात थेट शेतकऱ्यांच्या हाती डिजिटल कारभार दिला असून, मागील एका हंगामात ७२,४५,००० हून अधिक शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकाची नोंद स्वतःच सातबाऱ्यावर करून नवा इतिहास रचला आहे.

आता शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात प्रत्यक्ष उभे राहून, पिकाचा जिवंत फोटो काढून, अक्षांश-रेखांशासह (जीपीएस लोकेशन) तो ॲपवर अपलोड करावा लागतो. यामुळे पूर्वी होणाऱ्या चुकीच्या नोंदी, अंदाजे लावला जाणारा पीकपेरा आणि मानवी हस्तक्षेपातून होणारी फसवणूक पूर्णपणे संपुष्टात आली आहे. हा तंत्रज्ञानाचा पारदर्शक चमत्कार आहे, ज्याने महसूल प्रशासनातील दप्तरदिरंगाईला चाप लावला आहे.

एक कोटी आकडेवारी
राज्यातील १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केले असून, रात्री-अपरात्री कधीही, केवळ १५ रुपयांत डिजिटल स्वाक्षरी असलेला अधिकृत सातबारा थेट मोबाइलवर उपलब्ध होत आहे.
९०% शेतकऱ्यांना अवघ्या २४ तासांच्या आत हा ऑनलाइन सातबारा मिळत असून, आतापर्यंत तब्बल ३ कोटींहून अधिक डिजिटल सातबारा डाऊनलोड्सचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे.
पीकपेरा थेट ऑनलाइन सातबाऱ्यावर रिअल-टाइम जोडला गेल्यामुळे बँकांकडून पीक कर्ज मिळणे गतिमान झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे,  अवकाळीमध्ये कोणत्याही मध्यस्थाशिवाय, पीक विम्याची अचूक भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

नाशिक विभाग आघाडीवर
विभागनिहाय
पीकपेरा रिपोर्ट 
नाशिक
१५,८०,००० यशस्वी नोंदींसह. 
पुणे
१४,२०,००० शेतकऱ्यांचा डिजिटल सहभाग.
अमरावती
११,९५,००० कापूस, सोयाबीन उत्पादक ऑनलाइन.
नागपूर
१०,१०,००० धान उत्पादकांचा ॲपला प्रतिसाद.
छ. संभाजीनगर
९,४०,००० दुष्काळी भागातील नोंदी पूर्ण.
लातूर
७,५०,००० शेतकऱ्यांनी भरला स्वतःचा पीकपेरा.
कोकण
३,५०,००० भात उत्पादक डिजिटल प्रवाहात.

Web Title : महाराष्ट्र के 70 लाख किसानों को डिजिटल सातबारा, खत्म हुआ बाबूगिरी

Web Summary : महाराष्ट्र के 70 लाख से अधिक किसानों को 'ई-पीक पाहणी' ऐप से डिजिटल सातबारा मिला, जिससे अधिकारियों पर निर्भरता खत्म हो गई। किसान स्वयं फसलें दर्ज कर सकते हैं, ऋण और बीमा दावों को सुव्यवस्थित कर सकते हैं, जो कृषि प्रशासन में एक महत्वपूर्ण बदलाव है।

Web Title : 7 Million Maharashtra Farmers Access Land Records Digitally, Ending Bureaucracy

Web Summary : Over 7 million Maharashtra farmers now access their land records digitally via the 'E-Peek Pahani' app, eliminating reliance on officials. This transparent system allows farmers to record crops themselves, streamlining loan access and insurance claims, marking a significant shift in agricultural administration.

टॅग्स :Farmerशेतकरी