Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...

दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...

Petrol-Diesel Price: केंद्र सरकारने गेल्या शुक्रवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर ३ रुपयांची वाढ केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 08:23 IST2026-05-18T08:21:12+5:302026-05-18T08:23:51+5:30

Petrol-Diesel Price: केंद्र सरकारने गेल्या शुक्रवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर ३ रुपयांची वाढ केली.

Petrol-Diesel Price: How much is petrol-diesel available for today after the price hike? Know the latest prices in your city | दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...

दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...

Petrol-Diesel Price on May 18: इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात अनेक महिन्यांपासून स्थिर असलेले इंधनाचे दर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात शुक्रवारी (१५ मे) देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर ३ रुपयांची वाढ केली. 

विशेष म्हणजे, किरकोळ ग्राहकांसाठी गेल्या जवळपास चार वर्षांत करण्यात आलेली ही पहिलीच दरवाढ आहे. दरम्यान, आज म्हणजेच १८ मे रोजी देशभरात इंधनाचे दर स्थिर असून कालच्या तुलनेत यात कोणताही बदल झालेला नाही. 

आजचे देशभरातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर:

शहरपेट्रोलची किंमत प्रति लिटरडिझेलची किंमत प्रति लिटर
दिल्ली९७.७७ रुपये९०.६७ रुपये
मुंबई१०६.६८ रुपये९३.१४ रुपये
कोलकाता१०८.७० रुपये९५.१३ रुपये
बंगळुरू१०६.२१ रुपये९४.१० रुपये
चेन्नई१०३.६७ रुपये९५.२५ रुपये
लखनऊ९७.५५ रुपये९०.८२ रुपये
पटना१०८.५५ रुपये९४.६३ रुपये
रायपूर१०३.५६ रुपये९६.५५ रुपये
रांची१००.८४ रुपये९५.७६ रुपये


सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

बाजार तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या या वाढीचा थेट फटका सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला बसणार आहे. किराणा मालाचे बिल आणि दैनंदिन सेवा महागण्याची दाट शक्यता आहे. बिस्किट्स, स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स, खाद्यतेल आणि पॅकेज्ड फूड यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तू महाग होऊ शकतात. या कंपन्यांचे संपूर्ण जाळे वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असते. डिझेल महागल्यामुळे कंपन्यांचा लॉजिस्टिक्स आणि वितरणाचा खर्च वाढणार आहे, परिणामी उत्पादनांच्या किमती वाढू शकतात.

शेतातून बाजारपेठेत (मंडई) आणि तिथून ग्राहकांपर्यंत माल पोहोचवण्याचा वाहतूक खर्च वाढल्याने फळे आणि भाज्यांचे दरही कडाडण्याची शक्यता आहे. वाहतूक आणि इतर परिचालन खर्च वाढल्याचे कारण देत 'अमुल' आणि 'मदर डेअरी'ने नुकतीच दुधाच्या दरात प्रति लीटर २ रुपयांची वाढ केली आहे. आता इंधन दरवाढीमुळे इतर डेअरी उत्पादनांवरही याचा परिणाम दिसू शकतो.

Web Title : पेट्रोल और डीजल की कीमतों में वृद्धि: अपने शहर में नवीनतम दरें जांचें

Web Summary : ₹3 प्रति लीटर की हालिया मूल्य वृद्धि के बाद, आज ईंधन की कीमतें स्थिर हैं। परिवहन लागत में वृद्धि से दैनिक आवश्यक वस्तुओं पर असर पड़ सकता है, जिससे खाद्य पदार्थों और डेयरी उत्पादों की कीमतें बढ़ सकती हैं, जिससे घरेलू बजट प्रभावित हो सकता है।

Web Title : Petrol and Diesel Prices Rise: Check Latest Rates in Your City

Web Summary : After a recent price hike of ₹3 per liter, fuel prices remain stable today. Increased transportation costs may impact daily essentials, potentially raising prices of food items and dairy products, affecting household budgets.