​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 08:48 IST2026-05-18T08:46:17+5:302026-05-18T08:48:38+5:30

Amravati Crime: अमरावती शहर एक तरुणाच्या हत्येने हादरले. तेजस बिलबिले याची आरोपींनी चाकूने वार करत हत्या केली. या घटनेत तेजसचा मित्र जखमी झाला आहे.

Amaravati shaken! Tejas stabbed to death over old dispute; Crime Branch arrests 3 accused in 2 hours before case is registered | ​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या

​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या

अमरावती: शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी (१७ मे) मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या वादातून एका तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरा एक तरुण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यापूर्वीच गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने चक्रे फिरवून, अवघ्या २ तासांत तिन्ही मुख्य आरोपींना वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेतले आहे.

झेंडा चौकात वाद आणि चाकूने केले वार

​मिळालेल्या माहितीनुसार, तेजस श्रीकृष्ण बिलबिले (रा. माळीपुरा, अमरावती) असे मृत तरुणाचे नाव आहे. १७ मे रोजी उशिरा रात्री माळीपुरा परिसरातील झेंडा चौकात जुन्या वादाचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाले. यावेळी आरोपींनी धारदार चाकूने तेजसच्या छातीवर सपासप वार केले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. यासोबतच, त्याचा मित्र कार्तिक दिगंबर बोरुडे (रा. माळीपुरा) याच्यावरही चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर जखमी कार्तिकवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​१८ मे रोजी पहाटे नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी कुंड सर्जापूर, वडाळी आणि मालटेकडी परिसरातून आकाश राजू बेलसरे (वय २७ वर्ष), वैभव राजू बेलसरे (वय २५ वर्ष) व राजू उत्तमराव बेलसरे (वय ५४ वर्ष) या तिघांना अटक केली.सर्व आरोपी माळीपुरा, अमरावती येथील रहिवासी आहेत.

​हत्येचे मूळ कारण अस्पष्ट

​हा खून नेमका कोणत्या कारणास्तव आणि जुन्या कोणत्या वादातून झाला, याचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली खोलापुरी गेट पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. विशेष म्हणजे खोलापूरी गेट ठाण्याच्या हद्दीत आठवड्यामधला हा दुसरा खून ठरला आहे.

Web Title : अमरावती में पुरानी रंजिश के चलते युवक की हत्या, आरोपी गिरफ्तार

Web Summary : अमरावती में पुरानी रंजिश के चलते तेजस नामक एक युवक की निर्मम हत्या कर दी गई। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए दो घंटे के भीतर तीन संदिग्धों को गिरफ्तार कर लिया। हमले में एक अन्य युवक गंभीर रूप से घायल हो गया। हत्या का कारण अभी स्पष्ट नहीं है।

Web Title : Amravati Shaken: Youth Murdered Over Old Dispute, Accused Arrested

Web Summary : In Amravati, a young man named Tejas was brutally murdered due to an old dispute. Police swiftly arrested three suspects within two hours. Another youth was seriously injured in the attack. The investigation continues to determine the exact motive.