शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हिस चार्ज ऐच्छिकच!

By admin | Updated: January 19, 2017 02:39 IST

सर्व्हिस चार्ज आणि सर्व्हिस टॅक्स या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे ग्राहकांनी लक्षात घेतले पाहिजे.

सर्व्हिस चार्ज आणि सर्व्हिस टॅक्स या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे ग्राहकांनी लक्षात घेतले पाहिजे. अनेकदा नावात गल्लत होते. सर्व्हिस टॅक्स हा सरकारी नियमानुसार बिलावर आकारला जातो. पण सर्व्हिस चार्ज हा प्रत्येक हॉटेलमध्ये ग्राहकाला दिलेल्या सेवेसाठी आकारला जातो. हा चार्ज ग्राहकाला देणे ऐच्छिक आहे. एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर तिथली सेवा ग्राहकाला आवडली नाही तर तो सर्व्हिस चार्ज देणे नाकारू शकतो. पण हॉटेलच्या बिलामध्येच हा चार्ज आकारला जात असल्यामुळे ग्राहकाला हा चार्ज नाकारणे कठीण जाते. हॉटेल्सना सर्व्हिस चार्ज आकारायचा असल्यास त्यांनी ग्राहकाला याची स्पष्ट कल्पना देणे गरजेचे आहे. पण असे होत नाही. यावर उपाय म्हणजे हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळच दिसेल अशा ठिकाणी फलक लावणे अपेक्षित आहे. या फलकावर हॉटेल मालकाने आकारण्यात येणारा सर्व्हिस चार्ज स्पष्टपणे नमूद केलेला पाहिजे. यामुळे ग्राहकाला निर्णय घेता येईल. त्याला हॉटेलने नमूद केलेला सर्व्हिस चार्ज द्यायचा नसल्यास तो त्या हॉटेलमध्ये जाणे टाळेल. हॉटेलमध्ये मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबीयांसमवेत गेल्यावर बिल अधिक आल्यास बिलावरून वाद घालणे योग्य दिसत नाही. त्यामुळे अनेकदा ग्राहक बिल काहीच न बोलता देऊन टाकतात. हॉटेलमध्ये वेटर आणि सुरक्षारक्षक एकत्र येऊन बोलू लागल्यास ग्राहकाला वाद घालणे कठीण जाते.सेवा आवडल्यास पैसे देणे योग्य आहे. पण सेवा आवडली नसताना पैसे देणे बंधनकारक नाही. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे. हॉटेलमधले बिल तपासले पाहिजे. अथवा हॉटेलमध्ये गेल्यावर आधीच किती सर्व्हिस चार्ज आकारता हे विचारले पाहिजे. (लेखक कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाचे मानद सचिव आहेत.)