शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ अधिकारी कारवाईच्या छायेत

By admin | Updated: May 31, 2014 08:31 IST

कनगरा येथे पोलिसांनी ग्रामस्थांवर केलेल्या अमानुष अत्याचाराबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी जाहीर दिलगिरी व्यक्त केली.

विशाल सोनटक्के

उस्मानाबाद - कनगरा येथे पोलिसांनी ग्रामस्थांवर केलेल्या अमानुष अत्याचाराबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. तसेच सदर प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळणार्‍या पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध प्रशासकीय कार्यवाहीसोबत गुन्हे दाखल करण्याचे आदेशही गृहमंत्र्यांनी दिले. राज्यातील पोलीस दलाला या कारवाईतून योग्य संदेश जाईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. एरव्ही कारवाईचा बडगा कनिष्ठ अधिकार्‍यांवर उगारला जात असल्याच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर थेट वरिष्ठ अधिकार्‍यांवरच गुन्हे दाखल करण्याची कृती अनपेक्षित आहे़ ‘लोकमत’ने मागील चार दिवसांपासून या घटनेचा पाठपुरावा केला होता. गृहमंत्री पाटील यांनी शुक्रवारी पाचव्या दिवशी कनगर्‍यास भेट दिली. माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक एस. जगन्नाथ, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे या वेळी उपस्थित होते. येथील महिलांनी दारुबंदीची मागणी केली होती. अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी मध्यरात्री गावात जाऊन दिसेल त्याला झोडपून काढले. या मारहाणीत ५० पेक्षा अधिक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत होता. कनगरा येथे घडलेला प्रकार शासनाच्या सहनशिलतेपलीकडचा आहे. त्यामुळे आज कनगर्‍यात ग्रामस्थांसमोर येताना वेदना होत असल्याचे गृहमंत्री पाटील म्हणाले. प्रथम त्यांनी ग्रामस्थांशी व नंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपण या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक एस़ जगन्नाथ यांना चौकशीचे आदेश दिले. तसेच प्राथमिक चौकशीवरून साहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघांना निलंबित केले.