शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षा आता नव्या स्वरूपात, तीन ऐवजी होणार दोनच पेपर

By admin | Updated: September 13, 2016 17:49 IST

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च २०१६-१७ मध्ये इयत्ता चौथी व सातवी ऐवजी इयत्ता पाचवी व आठवीमध्ये घेण्यात येणार आहे.

ब्रम्हानंद जाधव, ऑनलाइन लोकमत

बुलडाणा : पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च २०१६-१७ मध्ये इयत्ता चौथी व सातवी ऐवजी इयत्ता पाचवी व आठवीमध्ये घेण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे व सामान्य विज्ञान या विषयांना वगळून गणित व बुद्धीमत्ता विषयांवर भर देण्यात आलेला आहे.   
नविन स्वरूपातील या शिष्यवृत्ती परीक्षेत गणित व बद्धीमत्ता या विषयांचा वरचष्मा राहणार आहे. इयत्ता चौथी व सातवीसाठी आतापर्यंत पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती. दरवर्षी घेतल्या जाणा-या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होते. त्यामुळे  इयत्ता चौथी व सातवीतील जवळपास प्रत्येक विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सहभाग घेतात. परंतू, सन २०१६-१७ पासून पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. पूर्वी इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे ३०० गुणांसाठी तीन पेपर घेण्यात येत होते. यात सन २०१६-१७ या वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलून इयत्ता चौथीच्या ऐवजी पाचवी व सातवीच्या ऐवजी आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ठेवण्यात आली आहे. तसेच तीन पेपर ऐवजी दोनच पेपर ठेवण्यात आले आहेत. या नव्या स्वरूपाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे व सामान्य विज्ञान या विषयांना वगळून गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी गुण वाढविण्यात आले आहेत. आतापर्यंत झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी प्रत्येकी ७० गुण ठेवण्यात आले होते. परंतू आता नव्या शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये गणित व बुद्धीमत्ता चाचणी या विषयांसाठी प्रत्येकी १०० गुण ठेवण्यात आले आहेत.
 
असे आहे शिष्यवृत्ती परीक्षेचे नविन स्वरूप-
-पेपर एकमध्ये प्रथम भाषा ५० गुण व गणित विषयासाठी १०० गुण.
-पेपर दोनमध्ये तृतीय भाषा ५० गुण व बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी १०० गुण.
-सोप्या स्वरूपाचे प्रश्न ३० टक्के
-मध्यम स्वरूपाचे प्रश्न ४० टक्के
-कठीण स्वरूपाचे प्रश्न ३० टक्के
 
शिष्यवृत्ती परीक्षेच्या नावात बदल-
आतापर्यंत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा असे नाव होते. परंतू, सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून,परीक्षेच्या नावातही बदल करण्यात आला आहे. आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना या नावाने सदर परीक्षेस ओळखले जाणार आहे.