शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिआॅनविरुद्ध साताऱ्यात गुन्हा

By admin | Updated: May 27, 2015 01:18 IST

आंतरजालावर सनी लिआॅनचे स्वत:चे संकेतस्थळ असून, इतरही अनेक संकेतस्थळांवर तिची छायाचित्रे, चित्रफिती झळकतात.

सातारा : छायाचित्रे आणि चित्रफितीद्वारे संकेतस्थळाच्या माध्यमातून अश्लीलतेचा प्रसार करीत असल्याबद्दल अभिनेत्री सनी लिआॅनविरुद्ध डोंबिवली पाठोपाठ साताऱ्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका सामाजिक कार्यकर्तीने याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दिली आहे.  रूपाली सुनील महाडिक (वय ४१, रा. लक्ष्मीनगर, शाहूपुरी) असे फिर्यादीचे नाव असून, त्या सामाजिक कार्य करतात. सनी लिआॅन व तिच्या साथीदारांनी संकेतस्थळावरून अश्लीलतेचा प्रसार चालविला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ‘सनी लिआॅन ही अभिनेत्री असून, सध्या ती भारतात वास्तव्यास आहे. स्वत:च्या देहाची अश्लील, विवस्र छायाचित्रे व चित्रफिती विविध माध्यमांतून प्रसिद्ध करून तिने अश्लीलतेचा प्रचार केला आहे. पाहणाऱ्यांच्या मनात विषयासक्ती निर्माण करण्याचा सनी लिआॅनचा हेतू आहे,’ अशा आशयाचा मजकूर (पान १० वर)तक्रारीत आहे.आंतरजालावर सनी लिआॅनचे स्वत:चे संकेतस्थळ असून, इतरही अनेक संकेतस्थळांवर तिची छायाचित्रे, चित्रफिती झळकतात. पाश्चात्त्य जगात ‘पोर्न स्टार’ म्हणूनच ज्ञात असलेल्या सनी लिआॅनच्या भारतातील पदार्पणाचा बराच गाजावाजा झाला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या असल्या, तरी ‘पोर्न स्टार’ हीच तिची प्रतिमा कायम राहिली असून, भारतातच वास्तव्याला असल्यामुळे तिच्याविरुद्ध ठिकठिकाणी तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. गेल्याच आठवड्यात डोंबिवली पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर आता दुसरी तक्रार साताऱ्यात दाखल झाली आहे.शाहूपुरी पोलिसांनी सनी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम २९२ आणि २९२ अ (अश्लील चित्र आणि छायाचित्र प्रदर्शित करणे), ‘इन्डिसेन्ट रिप्रेझेंटेशन आॅफ वूमन अ‍ॅक्ट’चे (स्रीच्या अशिष्ट प्रदर्शनास प्रतिबंध करणारा कायदा) कलम ३ व ४, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)