शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: 'मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार, त्या निवडणुकांचा इथे संबंध नाही'-संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 13:35 IST

Sanjay Raut: 'त्या निवडणुकांचा इथे काहीही परिणाम होणार नाही, मुंबई महापालिकेवर आमची सत्ता होती आणि पुढेही राहणार'

मुंबई: काल(10 मार्च) उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने चार राज्यात मोठा विजय मिळवला. तर, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसचा दारुण पराभव केला. दरम्यान, या निकालावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

'मुंबई पालिकेवर आमचीच सत्ता येणार'या पाच राज्यांचा येणाऱ्या पालिका निवडणुकीवर परिणाम होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, राऊत म्हणाले की, 'या राज्यांचा आणि मुंबई पालिकाचा काहीही संबंध नाही. गेल्यावेळेस पश्चिम बंगाल निवडणुकांच्या वेळेसही असेच बोलत होते. पण, त्याचा इथे काहीही परिणाम होणार नाही. मुंबई महापालिकेवर आमची सत्ता होती आणि पुढेही राहणार.' 

'माझ्या घरावर धाडी टाका, मी घाबरत नाही'राऊत पुढे म्हणाले की, 'काल शरद पवार साहेब होते, आम्ही तयार आहोत. आज मीही बोलतोय, जे करायचे ते करा. हे काय करतील, अजून रेड टाकतील, गुन्हे दाखल करतील. यांना दुसरं काही येत नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्दतीने वापर केला जातोय. एकाच आघाडीचे लोक टार्गेट केले जातायत. तपास यंत्रणेवर राजकीय तबाव आणला जातोय. राजकीय कारणांसाठीच आमच्यावर हल्ले होताहेत.  मी हे आता बोलतोय, दहा मिनिटांनी माझ्या घरावर धाड पडू शकते. पण, त्यांनी धाडी टाकाव्यात, मी कुणालाही घाबरत नाही,' असा इशाराही राऊतांनी दिला. 

'पंजाबमध्ये भाजपचे वाईट हाल'उत्तर प्रदेश आणि गोवा राज्यात शिवसेनेच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतदान झाले. त्यावरुन राऊतांना प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, 'उत्तर प्रदेशात आम्हाला मोठा पाठिंबा नाही, आमच्या उमेदवाराला कमी मतदान झाल्यामुळे तुम्ही आम्हाला टोला मारता. पण, आमच्यापेक्षा तुमचे वाईट हाल पंजाबमध्ये झाले आहेत. तिकडे तुमच्याही उमेदवारांना विजय मिळवता आला नाही,' असंही राऊत म्हणाले.

संबंधित बातमी- 'पंजाबमध्ये विजयी होऊन दाखवा...', संजय राऊत यांचे भाजपला आवाहन

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPunjabपंजाबUttar Pradeshउत्तर प्रदेशgoaगोवाUttarakhandउत्तराखंडElectionनिवडणूक