संजय दत्तला पुन्हा हवी १४ दिवसांची सुट्टी

By Admin | Updated: December 4, 2014 11:11 IST2014-12-04T11:11:50+5:302014-12-04T11:11:50+5:30

१९९३ च्या बाँबस्फोटाप्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणा-या अभिनेता संजय दत्तने पुन्हा एकदा सुट्टीसाठी अर्ज केला आहे.

Sanjay Dutt needs 14-day holiday | संजय दत्तला पुन्हा हवी १४ दिवसांची सुट्टी

संजय दत्तला पुन्हा हवी १४ दिवसांची सुट्टी

>ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. ४ - १९९३ च्या बाँबस्फोटाप्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणा-या अभिनेता संजय दत्तने पुन्हा एकदा सुट्टीसाठी अर्ज केला आहे. संजय दत्तने तुरुंग प्रशासनाकडे १४ दिवसांच्या संचित रजेसाठी अर्ज केला असून प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
१९९३ च्या बाँबस्फोटात बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षाची शिक्षा झाली असून सध्या तो येरवडा तुरुंगात आहे.गेल्या वर्षी कधी स्वतःची प्रकृती तर कधी पत्नी मान्यताच्या प्रकृतीचे कारण पुढे करत संजय दत्त तुरुंगातून बाहेर आला होता. आता पुन्हा एकदा संजय दत्तने १४ दिवसांच्या सुट्टीसाठी अर्ज केला आहे. सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच संजय दत्तच्या अर्जावर निर्णय घेतला जाईल असे तुरुंग प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.
आघाडी सरकार असताना संजय दत्तला वारंवार सुट्टी मिळत असल्याने भाजपा व अन्य पक्षांची टीका केली होती. गृहमंत्री आर.आर. पाटील हे टीकेचे लक्ष्य ठरत होते. संजय दत्तला विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोपही भाजपाने केला होता. आता राज्यात भाजपाची सत्ता असून गृहखाते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे आता संजूबाबावर भाजपाही कृपादृष्टी दाखवेल का याविषयी चर्चा रंगली आहे. 

Web Title: Sanjay Dutt needs 14-day holiday