शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

फर्लो रजेप्रकरणी संजय दत्त निर्दोष!

By admin | Updated: February 19, 2015 08:30 IST

फर्लोची मुदत उलटल्यावरही दोन दिवस पुण्यातील येरवडा तरुंगात दाखल न झालेला अभिनेता संजय दत्त निर्दोष असून, तुरुंगाधिकारी व पोलीस यांच्या गोंधळामुळे तो दोन दिवस बाहेर राहिला.

मुंबई : फर्लोची मुदत उलटल्यावरही दोन दिवस पुण्यातील येरवडा तरुंगात दाखल न झालेला अभिनेता संजय दत्त निर्दोष असून, तुरुंगाधिकारी व पोलीस यांच्या गोंधळामुळे तो दोन दिवस बाहेर राहिला. त्यामुळे आता संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असून, संजयची चार दिवसांची रजा बुडणार आहे.फर्लोची मुदत संपल्यावर येरवडा तुरुंगात दाखल होण्याकरिता ८ जानेवारीला सायंकाळी संजय पोहोचला. मात्र तोपर्यंत त्याने केलेल्या रजेच्या नव्या अर्जावर तुरुंगातील संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलाही निर्णय घेतला नव्हता. परिणामी दोन दिवस तो बाहेर राहिला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिले होते. आता याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून, संजयची यामध्ये कुठलीही चूक नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे शिंदे म्हणाले. संजय दत्त याच्या फर्लोच्या अर्जावर ४५ दिवसांनी नव्हे, तर ११३ दिवसांनी निर्णय घेण्यात आला. २२ सप्टेंबरला फर्लोकरिता पात्र ठरलेल्या संजयला २३ डिसेंबरला रजा मंजूर झाली. ८ जानेवारीच्या सूर्यास्तापूर्वी संजयने येरवडा कारागृहात हजर व्हायला हवे होते. मात्र त्याच्या वकिलांनी रजा वाढवण्याबाबत केलेल्या अर्जावर तुरुंगातील संबंधित अधिकारी व पोलीस यांनी वेळेत निर्णय न घेतल्याने किंवा निर्णय घेऊनही त्याबाबतचे आदेश पोस्टामार्फत धाडण्याची चूक केल्याने संजय दोन दिवस बाहेर राहिला, असे शिंदे यांनी सांगितले.रजा मंजूर करताना पोलिसांची संमती घेण्याची कायद्यात तरतूद नाही. मात्र मेधा गाडगीळ या गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव असताना त्यांनी एक परिपत्रक काढून पोलिसांच्या संमतीची अट आवश्यक असल्याचे नमूद केले. यामुळे तुरुंगाधिकारी व पोलीस यांच्यात समन्वयाचा अभाव निर्माण झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.