शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीला पुन्हा अवकाळीचा तडाखा

By admin | Updated: March 9, 2015 23:48 IST

शेगावला गारपीट : मिरज, तासगावात रिमझिम; द्राक्षबागायतदार धास्तावले; रब्बी हंगामही हाताबाहेर

लिंगनूर/सोनी/मणेराजुरी/शेगाव : गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदारांचे कंबरडे मोडले असताना रविवारी पुन्हा मिरज पूर्व, तासगाव, कवठेमहांकाळ, जत तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली. शेगाव परिसरात तर गारपीटही झाली. गेल्या आठवड्यातील पावसाने नुकसान व्हायचे ते झालेच, पण त्यातूनही अक्षरश: जिवाचे रान करून वाचविलेल्या फळबागा, तसेच रब्बी पिकांची सोमवारी रिमझिम पावसाने वाताहात केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात शिरढोण परिसरातही पाऊस पडला. तासगाव तालुक्यात सावर्डे, खुजगाव परिसरातही गारांचा पाऊस पडला.लिंगनूर/ सलगरे : मिरज पूर्व भागातील सीमावर्ती गावे चाबुकस्वारवाडी, शिरूर, पांडेगाव, अळट्टी, खटावचा सीमाभाग या परिसरात सायंकाळी सहापासून पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने पुन्हा शेतीपिके, रॅकवरील बेदाण्याचे नुकसान, कलिंगड, ज्वारी, गहू, कडबा, राशी केलेली धान्ये यांचे नुकसान संभवत आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस आठवडाभरातच दुसऱ्यांदा झटका देऊ लागल्याने केवळ द्राक्षे व बेदाणा उत्पादकच नव्हे, तर सामान्य शेतकऱ्यालाही त्याचा मोठा फटका बसू लागला आहे.मिरज पूर्व भागातील सीमावर्ती चाबुकस्वारवाडी, खटाव, शिरूर या परिसरात काल रात्रीही अत्यंत ढगाळ वातावरण झाले होते. काही ठिकाणी काल पावसाचा हलका शिडकावा झाला . यामुळे सीमाभागातील द्राक्षे, रॅकवरील बेदाणा, गहू, शाळू, कलिंगड या पिकांना फटका बसणार आहे. सोनी : ढगाळ पावसामुळे द्राक्ष बागायतदारांसह शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. अजून ३० ते ३५ टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. शेगाव : जत तालुक्यातील शेगावमध्ये गारांचा पाऊस झाल्यानंतर आवंढी, बनाळी, लोहगाव, वायफळ, अंतराळ या भागातही हलक्या पावसाच्या सरी पडल्या. या भागात सध्या शेतीची कामे सुरू आहेत. मजुरांचा व यंत्रांचाही तुटवडा असल्याने ज्वारी, गहू, हरभरा शेतातच पडून आहे. या पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मणेराजुरी : मणेराजुरीसह परिसरास अवकाळी पावसाचा दुसऱ्यांदा तडाखा बसला आहे. द्राक्षबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरातील रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे. तासगाव पूर्व भागात आज सायंकाळी ६.३0 च्या सुमारास रिमझिम पावसाने सुरुवात केली. त्यामुळे शेतकरीवर्गाची धांदल उडाली. आठवड्यापूर्वी पावसाच्या तडाख्यानंतर लवकरात लवकर द्राक्षे काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू होती. गारांचा पाऊस अन् धावपळउत्तर भागातील शेगाव येथे सायंकाळी साडेपाच वाजता गारपीट झाली. पंधरा मिनिटे गारा पडल्याने शेगाव परिसरातील ज्वारी, हरभरा, गहू, द्राक्ष, डाळिंब या पिकांचे नुकसान झाले आहे. शेगाव व उत्तर भागातील नाईक वस्तीपर्यंत गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली.