शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांचा दोघांवर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: June 15, 2014 21:56 IST

नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्‍यांना विचारणा करणार्‍या दोघांवर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना

दहीहांडा: नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्‍यांना विचारणा करणार्‍या दोघांवर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना येथून जवळच असलेल्या वडद बु. येथे शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी दहीहांडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे. वडद बु. येथील पूर्णा नदीच्या पात्रातील वाळू घाटाचा लिलाव झालेला नसतानाही वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उपसा सुरू आहे. उत्खननामुळे नदी पात्राची चाळणी झाली असून, नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे गावकर्‍यांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत वडद बु. येथील विनोद कळसकर यांनी शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास नदी पात्रात जाऊन वाळू माफियांना विचारणा केली असता त्यांनी कळसकर यांना फावडे, पाईप, सब्बलने मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कळसकर यांनी त्यांचा मित्र विशाल गोटूकले यांना भ्रमणध्वनीवरून हल्ल्याची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या गोटूकले यांच्यावरही वाळू माफियांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात विशाल गोटूकलेही गंभीर जखमी झाले. नंतर दोघांनाही उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर दोघांनाही रविवारी दुपारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दहीहांडा पोलिसांनी वडद खुर्द येथील संजय भटकर व अन्य आठ आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६०, १४३, १४५, १४७, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भास्कर तायडे पुढील तपास करीत आहेत.