शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून सनातनची पाठराखण

By admin | Updated: September 22, 2015 01:30 IST

राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजपाचे आव्हान पेलताना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार असल्याने शिवसेनेने हिंदुत्ववादी मते आपल्या पदरात पडावी याकरिता सनातन या वादग्रस्त संघटनेची पाठराखण केली आहे

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजपाचे आव्हान पेलताना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार असल्याने शिवसेनेने हिंदुत्ववादी मते आपल्या पदरात पडावी याकरिता सनातन या वादग्रस्त संघटनेची पाठराखण केली आहे. खऱ्या गुन्हेगारांना सोडू नका, पण हिंदुत्वाला बदनाम करणाऱ्या सुुपाऱ्या वाजवू नका, असा टोला गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुखपत्रातून लगावला आहे.कल्याण-डोंबिवली अथवा मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपाचेच आव्हान आहे. भाजपाने हिंदुत्वापेक्षा सध्या विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य दिले आहे. त्यातच भाजपा प्रणीत सरकार असताना व गृहखाते भाजपाकडे असताना ‘सनातन’ या हिंदुत्ववादी संघटनेवर पानसरे हत्येकरिता कारवाई झाल्यामुळे सनातन संस्थेला पाठिंबा देऊन हिंदुत्वाची कास आपण कदापि सोडणार नाही, असे संकेत शिवसेनेने दिले आहेत.पानसरे, दाभोलकरांचे खरे खुनी शोधायलाच हवेत; मात्र त्यासाठी गायकवाडला विनाचौकशी फासावर लटकवा व सनातनवर लगेच बंदी घाला अशी डबडी वाजू लागली आहेत. हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे, असे मुखपत्रात म्हटले आहे. पुरोगामी लोक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मिळणाऱ्या धमक्यांबाबत मात्र तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसले होते. हे ढोंग आहे व आता पानसरे हत्या प्रकरणात सनातनवर बंदी घालण्यासाठी हेच सर्व निधर्मी म्हणवून घेणारे हिंदूंचेच देव पाण्यात घालून बसले आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे. (विशेष प्रतिनिधी)