शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

समीरच मारेकरी

By admin | Updated: October 8, 2015 03:50 IST

कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्याकडे बोट करून ‘हाच तो मारेकरी’

कोल्हापूर : कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्याकडे बोट करून ‘हाच तो मारेकरी’ असल्याचे प्रत्यक्षदर्शी १४ वर्षीय शाळकरी मुलाने पोलिसांना सांगितले. संशयित आरोपीची ओळख परेड तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्यासमोर बुधवारी कळंबा मध्यवर्ती कारागृहात झाली.समीरसह बारा संशयितांना सकाळी अकराच्या सुमारास कॉ. पानसरे यांच्या पत्नी उमा, त्यांची मोलकरीण, शेजारी राहणारी व्यक्ती व शाळकरी मुलगा अशा चौघांसमोर उभे केले होते. या वेळी शाळकरी मुलगा वगळता इतर तिघांनी ‘तो माणूस उपस्थित नव्हता,’ असे सांगितले. त्या मुलाने मात्र बारा संशयितांच्या चेहऱ्यावर नजर फिरवीत आणि अखेर समीरच्या दिशेने बोट करून ‘हाच तो मारेकरी’ म्हणून ओळखले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.समीरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. संशयित आरोपीची घटनास्थळावरील प्रत्यक्ष साक्षीदारांसमोर ओळख परेड घेण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज तपासी अधिकारी एस. चैतन्या यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्याकडे केला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ही परेड घेण्यात आली. ‘लोकमत’मध्ये सर्वप्रथम वृत्तपानसरे दाम्पत्यावर हल्ला झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी परिसरातील लहान मुलांकडे चौकशी केली असता चौदा वर्षांच्या मुलाने आपण हल्लेखोरांना पाहिल्याचे सांगितले होते. देशमुख यांनी त्याला विश्वासात घेऊन घटनास्थळी आणले व घटनेची पूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्याला पोलीस जीपमध्ये बसवून साहाय्यक पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी त्याचा जबाब नोंदविला आणि त्याला त्याच्या वडिलांसोबत घरी पाठविले. हे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ‘त्या’ मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे हल्लेखोरांचे रेखाचित्र बनविले होते.