सलमान खानची सुनावणी १ जुलैला

By Admin | Updated: June 16, 2015 03:32 IST2015-06-16T03:32:46+5:302015-06-16T03:32:46+5:30

हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा व दंड झालेला अभिनेता सलमान खान याने या शिक्षेविरोधात केलेल्या अपील याचिकेवर

Salman Khan hearing on July 1 | सलमान खानची सुनावणी १ जुलैला

सलमान खानची सुनावणी १ जुलैला

मुंबई : हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा व दंड झालेला अभिनेता सलमान खान याने या शिक्षेविरोधात केलेल्या अपील याचिकेवर येत्या १ जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सोमवारी या अपील याचिकेवर न्या. ए. आर. जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
या खटल्याची कागदपत्रे तयार नसल्याचे सलमानचे वकील अमित देसाई यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यावर न्यायालयाने या खटल्याची जलदगतीने सुनावणी घ्यायची आहे. त्यामुळे ही कामे तत्काळ पूर्ण करा, असे बजावले व ही सुनावणी तहकूब केली. वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत २००२ मध्ये सलमानने पाच जणांना चिरडले. त्यात एकाचा बळी गेला.
यासाठी दोषी धरत सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात सलमानला पाच वर्षांची शिक्षा व २५ हजारांचा दंड ठोठावला. याविरोधात सलमानने उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली. त्याची दखल घेत न्यायालयाने सलमानला जामीन मंजूर केला व ही याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली.

Web Title: Salman Khan hearing on July 1