"...तोपर्यंत पतंजलीच्या Coronil औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही" 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 06:56 PM2021-02-23T18:56:55+5:302021-02-23T18:59:52+5:30

Patanjali's Coronil And Maharashtra : कोरोनिल हे औषध वादाचा भोवऱ्यात सापडले आहे.

Sale of Patanjali's Coronil tablets won't be allowed in Maharashtra, says Home Minister Anil Deshmukh | "...तोपर्यंत पतंजलीच्या Coronil औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही" 

"...तोपर्यंत पतंजलीच्या Coronil औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही" 

Next

नवी दिल्ली - पतंजली योगपीठाचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी कोरोनिल (Coronil) हे कोरोनावरील औषध जगासमोर आणलं. तसेच हा कोरोना बरा करण्याचा उपाय असून गुणकारी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र कोरोनिल हे औषध वादाचा भोवऱ्यात सापडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या उपचारांसाठी कोणत्याही पारंपारिक उपचारांना परवानगी दिलेली नाही तसंच अशा उपचारांचा दावा करत असलेल्या कोणत्याही संस्थेला सर्टिफिकेट्ही दिलेलं नसल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कोरोनिल संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. 

अनिल देशमुख यांनी "सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही" असं स्पष्ट केलं आहे. "पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रश्न उपस्थित केले असून जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणं आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाहीठ असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "जागतिक आरोग्य संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही" असं देखील देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना व्हायरसशी लढणारं औषध शोधण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरू असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' समूहाने कोविड-19 आजारावर 'कोरोनिल' या आयुर्वेदिक औषधाची घोषणा केली होती.

पतंजलीचं टेन्शन वाढलं असून Twitter वर बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. WHOच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या उपचारांसाठी कोणत्याही पारंपारिक उपचारांना परवानगी दिलेली नाही तसंच अशा उपचारांचा दावा करत असलेल्या कोणत्याही संस्थेला सर्टिफिकेट्ही दिलेलं नसल्याचं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेची ही माहिती पतंजलीनं औषध लॉन्च केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आली आहे. यात असं दिसून आलंय की WHO च्या सर्टिफिकेशन स्कीमअंतर्गत आयुष मंत्रालयाचे सर्टिफिकेट मिळाले आहे.

पतंजलीचं टेन्शन वाढलं! Twitter वर बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी; WHOच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप

जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO दक्षिण पूर्व एशियाच्या रीजनल अधिकाऱ्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की, कोरोनाच्या औषधाचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्टिफिकेशन करण्यात आलेलं नाही. रामदेव बाबा यांनी अशी घोषणा केली होती की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोविडवर (COVID-19) उपचार होतील. आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली. यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या या ट्विटच्या आधारे बाबा रामदेव यांनी फसवणूक केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. 


 

Web Title: Sale of Patanjali's Coronil tablets won't be allowed in Maharashtra, says Home Minister Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.