शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

साहित्य परिषद बेळगाव सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 11:40 PM

प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा पेटला...

ठळक मुद्देमहाराष्ट्र सहित्य परिषद पुढाकार घेऊन याबाबतचा ठराव मांडणार

प्रज्ञा केळकर- सिंग 

पुणे : वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा पेटला आहे. मराठी भाषिक आणि कन्नड भाषिकांमध्ये संवादाची दरी निर्माण झाली असून, दोन्ही राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये याबाबत नव्याने ठराव करुन सरकारकडे पाठपुरावा करावा आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी, असे मत साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सहित्य परिषद पुढाकार घेऊन याबाबतचा ठराव मांडणार आहेत.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळया घाला, असे भीमाशंकर पाटील यांनी केलेले बेताल वक्तव्य आणि उध्दव ठाकरे यांना बसवराज होरट्टी यांनी ‘उपदव्यापी ठाकरे’ असे संबोधन या घटनांचा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. त्यानंतर कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे आंदोलन, प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकातील संघटनांनी उध्दव ठाकरे यांच्या पुतळयाचे केलेले दहन, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक दहन अशा एकामागून एक घडलेल्या घटनांमुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव आणि कारवार हा कर्नाटकव्याप्त भाग आहे. मराठी माणसांचा हा हक्काचा भाग महाराष्ट्रा समाविष्ट व्हावा, यासाठी राजकीय मतभेद विसरुन कायदेशीर लढाईला वेग देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सीमाभागातील लोकांना न्याय मिळावा, यासाठी संमेलनातही हा ठराव मांडण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतला आहे.  साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले, ‘बडोदा साहित्य संमेलनाच्या उदघाटनात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनातील सर्व ठराव, मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. एक महिन्याच्या आत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल, असेही सांगितले. मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका पाहता, त्यांच्यावर विश्वास ठेवावा यादृष्टीने ठरावामध्ये बेळगाव प्रश्नाचा ठराव मांडण्यात आला नाही. मात्र, फडणवीस सरकार विश्वासास पात्र ठरले नाही. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी बेळगाव प्रश्नावर सकारात्मक भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संमेलनाच्या निमित्ताने ठराव मांडून साहित्य महामंडळाने त्यांच्या भूमिकेला बळ मिळेल, असे पाऊल उचलावे.’-------------  ‘लोकमत’शी बोलताना मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘कन्नडिगा लोकांचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे. सीमाभागातील लोकांवर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी साहित्य परिषदेतर्फे उस्मानाबाद साहित्य संमेलनात ठराव मांडला जाईल. मी एका डोळयात आसू आणि एका डोळयात आसू घेऊन चाललो आहे. गेल्या ६० वर्षांपासून सीमाभागातील लोकांचा प्रश्न प्रलंबित आहे. मोठमोठे प्रश्न सोडवणा-या सरकारला हा प्रश्न सुटत नाही, याचे आश्चर्य वाटते. राजकीय गणिते आणि दुबळया इच्छाशक्तीचा हा परिणाम आहे. सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री यांनी सुसंवादासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपली बाजू न्यायालयात लावून धरली पाहिजे. सीमाभागातील लोकांना न्याय मिळावा, आणि त्यांच्यावर होणा-या अत्याचाराचा तीव्र शब्दांत निषेध करावा, यासाठी साहित्य परिषद ठराव मांडणार आहे.’ 

टॅग्स :PuneपुणेKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रBorderसीमारेषाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद