शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

Rupali Chakankar : Video - "चिखलफेक करणारी विकृती..."; रुपाली चाकणकरांचं सडेतोड उत्तर; बोटावरच्या जखमेचं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:15 IST

Rupali Chakankar And Ashok Kharat : रुपाली चाकणकर या खरातच्या ट्रस्टवर पदाधिकारी होत्या. त्यांना देखील चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. याच दरम्यान चाकणकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

एका विद्यार्थिनीसह दोन महिलांनी भोंदू अशोक खरातविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर सोमवारी आणखी तीन गुन्हे दाखल झाल्याची माहिती एसआयटीने दिली. त्यामुळे बाबाविरोधात आता एकूण सहा गुन्हे दाखल झाले असून त्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर या खरातच्या ट्रस्टवर पदाधिकारी होत्या. त्यांना देखील चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. याच दरम्यान चाकणकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

"खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे, सत्य समोर येईलच" असं म्हटलं आहे. रुपाली चाकणकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट करत व्हिडीओ देखील शेअर केला आहे.  "गेली वीस बावीस वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना , जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तसतशी चिखलफेक करणारी विकृती वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने शांतपणाने टीका सहन केली, वैयक्तिक टीका करणं हे माझ्या रक्ताताच नाही. पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ते भयावह आहे."

"ज्यांनी हा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिलाय, ते सर्व संपर्क करून 'आम्ही सोबत आहोत' हे आवर्जून सांगतात. त्या सर्वांचे आभार. खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे. तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व त्यानंतरही माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे. सत्य समोर येईलच. धायरीकर तुमचे मनापासून धन्यवाद!" असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

नेमकं काय घडलं? 

रुपाली चाकणकर यांच्या बोटाला नेमकी कशामुळे जखम झाली याबाबत देखील आता काही लोकांनी माहिती दिली आहे. नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. "ताई आमच्याकडे दरवर्षी आरतीसाठी येतात. गाडीचा दरवाजा बंद करताना ताईंचं बोट अडकलं. बोटातून रक्त येत होतं. टिश्यू पेपर बोटाला लावून ताई आरतीला आल्या. मंडळाकडे याचा व्हिडीओ आहे. यामध्ये ताईंच्या हाताला जखम झालेली दिसेल. आता जो फोटो व्हायरल होत आहे तो ध चा मा केलं आहे. प्रत्यक्ष जे घडलं ते आता चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे" असं विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या अध्यक्षाने सांगितलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rupali Chakankar clarifies allegations amidst Ashok Kharat abuse case probe.

Web Summary : Rupali Chakankar denies involvement in the Ashok Kharat case, stating she resigned to ensure impartial investigation. She addresses personal attacks and clarifies the finger injury, attributing it to an accident during a ritual.
टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAshok Kharatअशोक खरातPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारी