शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी आघाडीची कसोटी

By admin | Updated: June 2, 2014 06:38 IST

भाजपा-शिवसेनेने विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनात सत्ताधार्‍यांची कोंडी करण्याची पूर्ण तयारी केली आहे

मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देदीप्यमान विजय मिळाल्याने फॉर्मात असलेल्या भाजपा-शिवसेनेने विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनात सत्ताधार्‍यांची कोंडी करण्याची पूर्ण तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आघाडीची कसोटी लागेल. लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४२ जागा जिंकलेली महायुती चार महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवत अधिवेशनात सरकारला घेरण्याची एकही संधी सोडणार नाही. विधानसभेची निवडणूक लढण्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली असली तरी सरकारची कोंडी करण्यासाठी त्यांचा पक्ष रविवारी महायुतीच्या तंबूत दिसला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, मनसेचे बाळा नांदगावकर यांनी संयुक्त पत्रपरिषद घेऊन सोमवारी सुरु होणार्‍या अधिवेशनात सरकारवर तोफ डागण्याचे इरादे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत महायुतीशी फारकत घेतलेल्या शेतकरी कामगार पक्षाने मात्र भाजपा-शिवसेनेपासून अंतर राखणेच पसंत केले. विरोधकांच्या पत्रपरिषदेला शेकापचे कोणीही नव्हते. मुख्यमंत्री चव्हाण यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकून संघर्षाची नांदी दिली. १४ जूनपर्यंत चालणार्‍या या अधिवेशनात वित्तमंत्री अजित पवार हे २०१४-१५ चा अर्थसंकल्प ५ जूनला सादर करणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)