शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाईबाबत सत्ताधाऱ्यांचा पळ

By admin | Updated: May 19, 2016 05:02 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदा नालेसफाईची पाहणी करणार नसल्याची घोषणा केली आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदा नालेसफाईची पाहणी करणार नसल्याची घोषणा केली आहे. नालेसफाईच्या कामात १५० कोटींचा घोटाळा झाला असल्यामुळेच त्यांनी पाहणी दौरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही भूमिका म्हणजे नालेसफाईच्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रकार असल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. वर्षभरात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नालेसफाईचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. पावसाळा १५ दिवसांवर आला असतानाही अद्याप नालेसफाईने वेग घेतला नसल्याचा आरोप करत, विरोधी बाकांवरील काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपाला लक्ष्य केले आहे, तर भाजपा नेते नालेसफाईवरून शिवसेनेवर शाब्दिक हल्ले चढवत आहेत. विरोधकांसह मित्रपक्ष भाजपानेही नालेसफाईवरून लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने, शिवसेनेने नालेसफाईची सारी जबाबदारी प्रशासनावर ढकलली आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांनी तर महापालिका आयुक्तांना पत्र लिहून नालेसफाईसाठी प्रशासनाला जबाबदार धरले. याबाबत निरुपम म्हणाले की, ‘पालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. त्यांनी मुंबईकरांना आश्वस्त करायला हवे, पण पाहणीच करणार नसल्याचे सांगत, उद्धव ठाकरे आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहेत. पालिकेचा कारभार पाहता, या वर्षीही पाणी साचण्याची शक्यता आहे. पाणी साचल्याने मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाला शिवसेनाच जबाबदार असेल, असे निरुपम म्हणाले. शिवसेना-भाजपाला मुंबईकरांची कामे करायची नसतील, तर त्यांनी सत्ता सोडून द्यावी. २० वर्षे सत्तेत असणारी भाजपा केवळ शिवसेनेवर आरोप करून आपले हात झटकत आहे. भाजपा सत्तेत राहून विरोधकाची भूमिका वठवू पाहत असल्याचे निरुपम यांनी सांगितले.