दोन रु पयांच्या महसुलासाठी २८ रु पये खर्च

By Admin | Updated: September 4, 2015 00:38 IST2015-09-04T00:38:38+5:302015-09-04T00:38:38+5:30

दोन रुपये महसूल मिळवण्यासाठी शिधावाटप कार्यालयाने सरकारच्या तिजोरीतील चक्क २८ रुपये खर्च केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Rs. 28 / - for two rupees | दोन रु पयांच्या महसुलासाठी २८ रु पये खर्च

दोन रु पयांच्या महसुलासाठी २८ रु पये खर्च

मुंब्रा : दोन रुपये महसूल मिळवण्यासाठी शिधावाटप कार्यालयाने सरकारच्या तिजोरीतील चक्क २८ रुपये खर्च केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
२००७ ते २०१३ दरम्यान सहा वर्षे ठामपाच्या मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयाच्या तळ मजल्यावर रेशनिंग विभागाचे ४७ फ हे कार्यालय सुरू होते. ही इमारत ठामपाने धोकादायक घोषित केल्याने दोन वर्षांपूर्वी ते कार्यालय मेक औद्योगिक वसाहतीमध्ये स्थलांतरित केले. ते ज्यासाठी स्थलांतरित केले होते, त्याची माहिती जाणून घेण्यासाठी बृहन्महाराष्ट्र अपंग विकास कामगार संघटनेचे सचिव युसुफ खान यांनी माहिती अधिकारांतर्गत मुंब्य्रातील शिधावाटप कार्यालयातील
संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यांनी मागितलेल्या माहितीची प्रत देण्यासाठी दोन रुपये जमा करावेत, हे त्यांना कळविण्यासाठी संबंधित कार्यालयाने पाठविलेल्या अतिजलद पत्रासाठी २८ रुपये
खर्च केल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Rs. 28 / - for two rupees