शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘झोपु’कडे थकले पालिकेचे १२०० कोटी

By admin | Updated: July 5, 2017 05:00 IST

पालिकेचा आर्थिक कणा असलेला जकात कर १ जुलैपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका उत्पन्नाच्या पर्यायी स्रोताच्या शोधात

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पालिकेचा आर्थिक कणा असलेला जकात कर १ जुलैपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका उत्पन्नाच्या पर्यायी स्रोताच्या शोधात आहे. त्याचवेळी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाकडे (एसआरए) १२०० कोटी रुपये थकले आहेत. पालिकेच्या जमिनीवर राबवण्यात आलेल्या झोपु योजनेंतर्गत जमीन अधिमूल्यापोटी तसेच विकास शुल्काच्या माध्यमातून ही रक्कम येणे आहे. जकात बंद झाल्यानंतर आर्थिक विंवचनेत असलेल्या महापालिकेसाठी ही रक्कम मोठा दिलासा ठरू शकेल. उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या जकात कारातूनच पायाभूत व नागरी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद होत असते. मात्र जकात बंद होऊन वस्तू व सेवा कर लागू झाल्यामुळे पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. हे नुकसान भरून देण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली आहे. मात्र आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पालिकेने जकात उत्पन्नाला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. पाणीपुरवठा, मालमत्ता करांच्या थकबाकीबरोबरच एसआरएमध्येही पालिकेचे पैसे अडकले आहेत. मुंबईत सध्या राबवले जात असलेले बहुतांशी झोपु प्रकल्प महापालिकेच्या जागेवर उभे राहिले आहेत. मात्र या इमारती उभ्या करण्यापूर्वी त्या जमीन अधिमूल्याची रक्कम पालिकेला देणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ही रक्कम पालिकेला देण्यात आलेली नाही.शिवसेना वापरणार मंत्रालयातील वजन जमीन अधिमूल्य, विकास शुल्क, पायाभूत सुविधा रक्कम अशी १२०० कोटींची थकबाकी आहे. पालिकेला देणे असलेल्या ९८१ कोटी व म्हाडाला देणे असलेल्या १९१ कोटी अशा प्रकारे अतिरिक्त रकमेवरच एसआरएला आयकर भरावा लागत आहे. ही थकबाकी तत्काळ देण्यास झोपडपट्टी प्राधिकरण तयार आहे. मात्र प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. तेथे हिरवा कंदील मिळाल्यानंतर रक्कम देण्यात येईल, असे झोपडपट्टी प्राधिकरणाने पालिकेला कळवले आहे.