शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 2:40 PM

corona: भाजप नेते राजकारण थांबवत नाहीत, अशी टीका पवारांनी केलीय.

ठळक मुद्देभाजप नेते राजकारण थांबवत नाहीत, हे दुर्दैवी वाटतंगुजरातमधील परिस्थिती विदारक, उत्तर प्रदेशची अवस्था चांगली नाहीही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची

मुंबई: महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची स्थिती भयंकर होताना दिसत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला लॉकडाऊन म्हणणार नाही, असे सांगत कठोर निर्बंध लागू केले. १४ एप्रिल ते १ मे या पंधरा दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आले असून, यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मात्र, भाजपशासित राज्यांमध्येही कोरोना संकट भीषण असून, तेथे कोरोनाचे व्यवस्थापक चांगले असल्याचा विरोधकांचा दावा फोल ठरतो, असे सांगत पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची बाजू उचलून धरली आहे. (rohit pawar criticises bjp over corona and other various issues)

केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रा व्यतिरिक्त छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार आदी राज्यांमध्येही करोनाचं संकट भीषण असल्याचं दिसून येतं. या राज्यांपैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपशासित राज्यांमधील करोना व्यवस्थापन खूपच चांगलं असल्याने तिथं करोना येत नाही हा विरोधकांचा दावा फोल ठरतो. यावरून राजकारण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावं, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विरोधकांवर रोहित पवार यांनी निशाणा साधला.

राज्यात काय सुरू आणि काय बंद? पाहा, एका क्लिकवर

भाजप नेते राजकारण थांबवत नाहीत

भाजपचे नेते महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीवरुन राजकारण करणं थांबवत नाहीत, हे दुर्दैवी वाटतं. आज राजकारणाची वेळ नसतानाही महाराष्ट्रातील सरकार असमर्थ आहे, इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली अशाप्रकारची विधानं विरोधकांकडून केली जात आहेत. ही गोष्ट मात्र निश्चितच खरीय की महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे आणि रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होतेय. मात्र हे संकट रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सर्व राज्यसरकार करतंय हेही तेवढंच खरंय. राज्यात परत एकदा नाईलाजास्तव कठोर निर्बंध घालण्याची वेळ सरकारवर आली, असे रोहित पवार म्हणाले. 

लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर

कोरोना लसीकरणात आज महाराष्ट्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे. आतापर्यंत राज्याने १ कोटी ५ लाख २९ हजार लसी दिल्या. यामध्ये पहिला डोस ९५ लाख २० हजार ७२५ लोकांना तर दुसरा डोस १० लाख ८ हजार लोकांना देण्यात आला. आज आपण दररोज साडेतीन ते चार लाख नागरिकांना लस देत असून आपली लसीकरणाची क्षमता ६ लाख प्रतिदिवसापर्यंत वाढवलीय. लस वाया जाण्याचे प्रमाणही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अत्यंत कमी आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

मोफत अन्नधान्य, अर्थसहाय्य, अनुदान... निर्बंध कडक करताना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 'पॅकेज'

गुजरातमधील परिस्थिती विदारक

गुजरातचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तिथंही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सुरत, अहमदाबाद, जामनगरमध्ये बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्णांवर हॉस्पिटलच्या आवारात, फरशीवर, खुर्चीवर बसून उपचार चालू असल्याचं चित्र पहायला मिळतं. दुसरीकडं मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी आठ-आठ तास थांबावं लागत असल्याचं विदारक चित्र पाहताना मन हेलावून जातं. रुग्णवाहिका नसल्याने कोणी चार चाकीतून मृतदेह नेतंय तर कोणी हात गाड्यावरून आहे. हे आज गुजरातचं भीषण वास्तव आहे, अशा शब्दांत पवार यांनी विरोधकांना आरसा दाखवला. 

उत्तर प्रदेशची अवस्था चांगली नाही

उत्तर प्रदेशमध्येही रुग्णांची अवस्था काही चांगली नाही. तिथं तर तीन रुग्णांना लस म्हणून रेबीजचं इंजेक्शन दिल्याची अत्यंत धक्कादायक बाब पुढं आली. बिहारमध्येही कोरोनाचे व्यवस्थापन नीट होत नसल्याचे निदर्शनास येतंय. तसंच मृतांची संख्याही सरकार लपवत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या, अशी टीका करत ही गोष्ट मात्र निश्चितच खरीय की महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे आणि काही रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होतेय, मात्र हे संकट रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सर्व राज्यसरकार करतंय हेही तेवढंच खरंय. पहिल्या लाटेपेक्षा ही लाट अत्यंत तीव्र आहे, रुग्णवाढीचा वेगही अधिक आहे, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले. 

महिन्याला १० हजार कमावणाऱ्या रिक्षाचालकांना केवळ दीड हजार; भाजपचे टीकास्त्र

ही मानवतेची लढाई

मला आजच्या परिस्थितीबाबत कोणाला दोष द्यायचा नाही. मला विरोधकांनाही हेच सांगायचंय की ही वेळ एकमेकांची उणी-दुणी काढण्याची नसून एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करण्याची आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे. आमच्या विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे करोना हा केवळ एखाद्याच राज्यात वाढत नसून तो सगळीकडेच वाढतोय. या कठीण काळात सगळ्या यंत्रणेचा कस लागतोय. अशा परिस्थितीत आपण भांडत बसलो तर त्यात नुकसानच अधिक होणार आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस