Maharashtra Lockdown: उद्यापासून राज्यात काय सुरू आणि काय बंद? पाहा, एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 09:50 PM2021-04-13T21:50:15+5:302021-04-13T21:50:52+5:30

Maharashtra Lockdown: पुढील १५ दिवसांच्या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचे आहे.

maharashtra lockdown know about what will start and closed till next 15 days | Maharashtra Lockdown: उद्यापासून राज्यात काय सुरू आणि काय बंद? पाहा, एका क्लिकवर

Maharashtra Lockdown: उद्यापासून राज्यात काय सुरू आणि काय बंद? पाहा, एका क्लिकवर

Next

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे. १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत राज्यांत कडक निर्बंध लावण्यात आले असून, राज्यात काय सुरू राहणार आणि काय बंद राहील, याचा घेतलेला हा आढावा... (maharashtra lockdown know about what will start and closed till next 15 days)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कडक निर्बंधांना ब्रेक द चेन असे नाव दिले आहे. राज्यात पुढील 15 दिवस कलम 144 लागू राहणार आहे. त्यानुसार राज्यात संचारबंदीचे आदेश लागू असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक बाब आहे.

राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, पुढचे १५ दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

या गोष्टी राहणार सुरू

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होणार नाही. अत्यावश्यक सेवांसाठी वाहतुकीचा वापर सुरू राहणा असून, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, वैद्यकीय कच्चा माल निर्मिती करणारे कर्मचारी, जनावरांचे दवाखान्यातील कर्मचारी, शितगृहे, वेअर हाऊसिंग, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, सर्व बँका, सेबी, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, दूरसंचार सेवा, ई-कॉमर्स, अधिस्विकृतीधारक पत्रकार, पेट्रोल पंप सुरु राहतील, शासकीय आणि खासगी सुरक्षा मंडळे, आयटी सेवा सुरू राहणार आहेत. तसेच हॉटेल्स रेस्टॉरंट्सवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम असून, टेक अवे, होम डिलिव्हरी सेवा सुरू राहतील. रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांनाही परवानगी देण्यात आली असून, त्यांनीही पार्सल व्यवस्थाच सुरू ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

कोरोनाशी लढण्यासाठी ५ हजार ४७६ कोटी रुपयांची मदत जाहीर; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा 

या गोष्टी बंद राहणार

राज्यात १४४ कलम लागू पुढील १५ दिवस राज्यात संचारबंदी आदेश लागू असतील. अनावश्यक कारणांसाठी नागरिकांचं बाहेर फिरणं पूर्णपणे बंद असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचं ठाम मत उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलं होतं. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊनचे संकेतच मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले होते. त्यानंतर कोविड टास्कफोर्स सोबतच्या बैठकीतही कडक लॉकडाऊन गरजेचाच असल्याचे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केलं होतं. राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यांसंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत, याशिवाय रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले होते.
 

Web Title: maharashtra lockdown know about what will start and closed till next 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.