Lockdown Breaking: Strict restrictions in the state from tomorrow, curfew for next 15 days; Chief Minister Uddhav Thackeray's big announcement | Lockdown Breaking: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, पुढचे १५ दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Lockdown Breaking: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, पुढचे १५ दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, त्यासाठी सोमवारी दिवसभर बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे. त्यामुळे, गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आता राज्यात उद्या म्हणजेच 14 एप्रिल रोजी रात्री 8 पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत, हे निर्बंध 1 मे पर्यंत लागू राहणार आहेत. मी नाईलाजाने हे निर्बंध लादत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8.30 वाजता राज्यातील जनेतशी फेसुबक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यातील जनतेला सर्वप्रथम गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर, राज्यातील कोरोना परिस्थितीची विदारक परिस्थिती कथन करत, लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. राज्यात कोरोना परिस्थितीचा सर्वाधिक भार वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर पडत आहे. आपण दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, पण आपल्याला कोरोनाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या घोषणेनुसार, राज्यात 14 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत कडक निर्बंध म्हणजेच एकप्रकारचा मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्र्यांचे भाषणातील मुद्दे

नैसर्गिक आपत्तीचे निकष लावावेत. त्यामुळे ज्यांची रोजी रोटी बंद झाली आहे, त्यांना मदत करण्याची शक्यता निर्माण होईल. ती मदत द्यावी.

उद्या संध्याकाळपासून  राज्यात १४४ कलम ( संचारबंदी) पुढचे १५ दिवस

सार्वजनिक वाहतूक सेवा चालू राहतील, बस आणि लोकलसेवा सुरूच राहणार आहेत.

लष्कराच्या मदतीने हवाई मार्गे ऑक्सिजन आणण्यासाठी मदत करण्याची पंतप्रधानांकडे विनंती करणार, पत्र लिहिणार

कोरोनाचा सामना करण्यासाठी ब्रिटन प्रमाणे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे लागणार

कोरोना व्हायरस : आता उणीदुणी काढत बसू नका, अन्यथा महाराष्ट्र माफ करणार नाही

कुणाला मदत करायची कोरोनाला, की कोरना विरोधात लढणाऱ्या सरकारला, हे जनतेनेच ठरवायचे आहे

जीएसटी परताव्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी 

हॉटेल रेस्टॉरंट्सवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध असतील 

पुढील एक महिन्यासाठी गरिब लाभार्थ्यांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देणार 

7 कोटी लोकांना एक महिना 3 किलो गहू, दोन किलो तांदूळ. रोजी मंदावेल, पण रोटी सुरू राहील.

गोर गरिबांना शिवभोजन थाळी एक महिना मोफत देणार

निर्बंधांच्याकाळात आरोग्य सुविधांकरिता स्थानिक प्रशासनासाठी ३ हजार ३०० कोटी निधी बाजूला काढला आहे

रुग्ण वाढ अशीच राहिली तर रेमडिसिवीरची आवश्यकता दुप्पट होणार 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lockdown Breaking: Strict restrictions in the state from tomorrow, curfew for next 15 days; Chief Minister Uddhav Thackeray's big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.