शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

“सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 09:43 IST

corona vaccination: सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे.

ठळक मुद्देरोहित पवार यांची भाजपवर टीकाप्रश्नांची उत्तरं राज्याच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी द्यावीत - पवारराज्याच्या हितासाठी प्रयत्न करावेत - पवार

मुंबई: कोरोना लसीकरण (corona vaccination) आणि पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले असून, राजकारण तापताना दिसत आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असून, पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास लसीकरण मोहीम ठप्प पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच आता विरोधी भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप फैरी झडताना दिसत आहेत. सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे. (rohit pawar criticised devendra fadnavis on corona vaccination drive in the state)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कोरोना लसीकरण मोहिमेवर भाष्य करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उत्तर प्रदेश आणि राज्याला मिळालेल्या कोरोना लसीच्या तुलनेबाबत केलेल्या विधानाचा रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे. लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतायेत. केंद्र सरकारच्या गृहितकानुसार वेस्ट रेट हा १०% असू शकतो, पण आपण तो अवघा ३% ठेवला. राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. 

Corona Vaccination: आता लस संकट? अनेक राज्यांत तुटवडा; लसीकरण ठप्प होण्याची शक्यता

काही ठिकाणी लसीचा साठा संपला

महाराष्ट्राला १.०६ कोटी डोस मिळाले असून, आपण दोन्ही डोस मिळून ९३.३२ लाख लोकांचं लसीकरण पूर्ण केलं तर ३ लाख डोस वाया गेले. आपल्याकडे १० लाख डोस शिल्लक असून ते परवापर्यंत संपतील. आज काही ठिकाणी लसीचा साठा संपला. त्यामुळे लसीकरण ठप्प झालं. वास्तविक आपण लसीकरणाचा वेग वाढवलाय. लसीकरण केंद्रावर नोंदणी केल्यानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटांत लस दिली जातेय. पण मागणीच्या प्रमाणात पुरवठा लस उपलब्ध नसल्याने लसीकरणामध्ये अडथळा निर्माण होतो, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने प्रश्न निकाली काढावा; रोहित पवारांचा सल्ला

प्रश्नांची उत्तरं राज्याच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी द्यावीत

अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग अजून किती वाढवायचा? केंद्राकडून लसींचा पुरवठा वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे राजकारण आहे का? राज्याला तातडीने अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का? या प्रश्नांची उत्तरं राज्याच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी द्यावीत, असे रोहित पवार म्हणाले. 

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; नाना पटोले संतापले

राज्याच्या हितासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत

केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आणि कशी मदत केली, हे सांगायची आता वेळ नाही. योग्य वेळी ते जनतेला नक्की कळेल. सध्या राज्याला संकटातून बाहेर काढायची वेळ आहे. त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते नक्कीच हातभार लावतील, ही अपेक्षा. विरोधी पक्षाला विनंती आहे की, किमान संकट काळात तरी राजकारण करू नका. सरकार पडणार नाहीच पण ते पडावं यासाठी आपण जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावेत, असा टोला लगावत संकटकाळी जनतेसोबत, सरकारसोबत उभं रहावं. महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील, असे पवार यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा