नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 19:42 IST2025-10-10T19:41:19+5:302025-10-10T19:42:10+5:30
Navi Mumbai Airport Name: नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याचा भाजप डाव आहे, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला.

नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
गोव्याला विमानतळाचे उदघाटनाप्रसंगी नरेंद्र मोदी यांनी विमानतळाला दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचे जाहीर केले.मात्र हेच पंतप्रधान नवी मुंबई विमानतळाच्या उदघाटनाप्रसंगी स्थानिकांची दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत चाकर शब्ध देखील काढला नाही.कारण कि नवी मुंबई विमानतळाला भाजपला आरएसएसच्या नेत्याच नाव देण्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी पनवेल येथे केला.
पनवेल तालुक्यातील चिंध्रन गावात येऊ घातलेल्या एमआयडीसीच्या भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत येथील ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.यावेळी कामगार नेते ऍडव्होकेट सुरेश ठाकूर,शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर,पनवेल जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील व इतर नेते उपस्थित होते.या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आ.रोहित पवार हे पनवेल मध्ये आले होते.त्यावेळी त्यांनी नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव दिले पाहिजे अशी भावना व्यक्त केली.आरएसएसला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झाल्याने आरएसएस च्या मोठ्या नेत्याचे नाव देण्याच्या तयारीत भाजप असल्याने मोदी यांनी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याबाबत कोणतीही घोषणा केली नसल्याचे आ.पवार यावेळी म्हणाले.