शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बेल्हा परिसरात रस्त्यांची लागली वाट

By admin | Updated: June 10, 2016 01:29 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासिनतेमुळे व अकार्यक्षमतेमुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली

बेल्हा : जांबुतफाटा ते बोरी बेल्हा (ता. जुन्नर) या पुणे-नाशिक महामार्गाला जोडून असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासिनतेमुळे व अकार्यक्षमतेमुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. यामुळे गावांचा विकास खुंटला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.जांबुतफाटा ते बोरी बेल्हा हा अहमदनगर व पारनेर या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा जवळचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. जांबुतफाटा ते बेल्हा या १४ किमी रस्त्यावर ठिकठिकाणी असंख्य खड्डे पडले आहेत. यापैकी २ किमी अंतरावर डांबरीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यावरील सर्व गावांमध्ये उसाचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. ऊसतोडणी काळात ऊस वाहतूक करणारे ट्रक, बैलगाडी, ट्रॅक्टर ही वाहने ऊसाच्या भारामुळे व एकेरी रस्ता असल्याने रस्त्याच्या खाली उतरत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये वाहन बाजूला घेण्यावरून भांडण व मारामारीचे प्रकार घडतात. शालेय मुलांची ये-जा रस्त्यावरून कायम असते. अनेक वेळा ऊसाचे वाहन साईडपट्ट्या भरण्यात आलेल्या नसल्यामुळे वाहने उलटतात. पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित न बुजविल्यामुळे पुन्हा खड्डे झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी खड्ड्यात फक्त मातीच टाकून बुजवितात. त्यामुळे माती निघून पुन्हा खड्डा पडतो, असे वारंवार होते, असे निवेदन सार्वजनिक बांधकाममंत्री, कार्यकारी अभियंता पुणे, जिल्हाधिकारी, पालकमंत्री आदींना सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव व राजेंद्र भोर यांनी पाठविलेली आहेत. (वार्ताहर)