शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

१९० कोटींची रस्ते दुरुस्ती

By admin | Updated: August 20, 2014 01:01 IST

जिल्ह्यात अतिवष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, डीपीसी निधी, विशेष रस्ते दुरुस्ती व पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते दुरुस्तीसाठी १९० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

जिल्हा परिषद : मंजूर कामांचे लवकच कार्यादेशनागपूर : जिल्ह्यात अतिवष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, डीपीसी निधी, विशेष रस्ते दुरुस्ती व पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते दुरुस्तीसाठी १९० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या कामाचे तातडीने कार्यादेश देण्याचे निर्देश मंगळवारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या बैठकीत देण्यात आले.अतिवृष्टीमुळे नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच डीपीसीकडून १६ कोटी मिळाले आहे. बैठकीत ८७ लाखांच्या निविदा स्वीकृत करण्यात आल्या. यातून २० कामे केली जाणार आहे. यात नागपूर तालुक्यातील ७ , उमरेड १, सावनेर ४, हिंगणा ६, कुही १ व मौदा तालुक्यातील ३ कामांचा समावेश असल्याची माहिती उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी दिली.रस्ते दुरुस्तीसोबतच तीर्थक्षेत्र विकास, आरोग्य केंद्र व अंगणवाड्यांचे बांधकाम अशा १९७ कामांना मंजुरी दिली आहे. कामाच्या निविदा काढल्या असून लवकरच कार्यादेश देण्यात येतील. २०१४ -१५ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणाचे १४१ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. यावर १७०० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत जि.प.रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी ६७ कोटींचा निधी मिळाला आहे. यातून १०२ कि.मी. लांबीचे रस्ते दुरुस्त केले जातील. तसेच पुलाच्या १६ कामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीला सदस्य कमलाकर मेंघर, अंबादास उके, प्रेम झाडे, सुरेंद्र शेंडे, शांताराम मडावी, आशा गायकवाड, संध्या गावंडे, नंदा नारनवरे यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)