शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

एक महिन्यात पुनर्वसित गावांची महसुली नोंद

By admin | Updated: June 23, 2014 01:13 IST

लहान मोठ्या विविध प्रकल्पांसाठी स्थलांतरित करण्यात आलेल्या पण अद्याप महसुली नोंद न झालेल्या नागपूर विभागातील सर्व पुनर्वसित गावठाणांची एक महिन्यात महसुली नोंद करण्याचे आदेश

नागपूर : लहान मोठ्या विविध प्रकल्पांसाठी स्थलांतरित करण्यात आलेल्या पण अद्याप महसुली नोंद न झालेल्या नागपूर विभागातील सर्व पुनर्वसित गावठाणांची एक महिन्यात महसुली नोंद करण्याचे आदेश प्रशासनाने विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे या गावांचा विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. विभागातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली व गोंदिया या सहा जिल्ह्यांत गोसेखुर्द, मिहान, एनटीपीसी यासह इतरही लहान मोठ्या प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. त्यामुळे शेकडो गावे स्थलांतरित झाली. स्थलांतरणाचे दु:ख पचवून प्रकल्पग्रस्त पुनर्वसित ठिकाणी राहायला गेले. पण महसूल खात्याला या गावठाणांची महसुली नोंद करण्यास विसर पडला होता. पुनर्वसित गावाची महसुली नोंद झाल्याशिवाय ते गाव शासनाच्या विविध योजनांसाठी पात्र ठरत नाही. शासनाकडून निधीही मिळत नाही. ग्रामपंयाचत अस्तित्वात येत नाही. तलाठी किंवा इतर महसुली कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करता येत नाही. गावाच्या विकासासाठी या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरतात. पण गेले अनेक वर्षे प्रशासनाने याबाबीकडे लक्षच दिले नाही.गोसेखुर्द प्र्रकल्पामुळे नागपूर जिल्ह्यातील ५१ गावे बाधित झाली. यापैकी सात गावांचे पुनर्वसन करण्यात आले असून एकाही गावाची महसुली गाव म्हणून नोंद नाही.याच कारणांमुळे नागपूर जिल्ह्यातील चार गावात ग्रामपंचायतींच्या निवडणुकासुद्धा घेता आल्या नाही.भंडारा जिल्ह्यातील २८ पुनर्वसित गावठाणांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. हे येथे उल्लेखनीय. बुधवारी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेताना प्रकल्पग्रस्तांनी याबाबीकडे विभागीय आयुक्तांचे लक्ष वेधले होते. एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. तसे पत्रही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधिी)