शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकारणारा निवृत्त कर्नल रमेश तनेजा गजाआड

By admin | Updated: June 2, 2014 23:02 IST

विशेष प्रकल्प अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल रमेश तनेजा यांना ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) रंगेहाथ अटक केली.

लाच स्वीकारणारा निवृत्त कर्नल रमेश तनेजा गजाआडशासनाच्या ग्राम स्वयंरोजगार योजनेत तनेजा प्रकल्पअधिकारीमुंबई। दि. 0२(प्रतिनिधी) शासन अनुदानित सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेतील विशेष प्रकल्प अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल रमेश तनेजा यांना ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) रंगेहाथ अटक केली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार केंद्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयामार्फत राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियान हा कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना हा विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या योजनेतून ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील १८ ते ३५ वयोगटातील तरूणांना सुरक्षा रक्षक, नर्सिंग, हाऊसकिपिंग, प्लंबिंग या सेवांचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी केंद्र शासनाकडून ७५ तर राज्य शासनाकडून २५ टक्के खर्च केला जातो. महाराष्ट्रात या योजनेमार्फत तरूणांना प्रशिक्षण देण्याचे काम शासनानरे टॉप्सग्रुप इंटरनॅशनल सिक्युरीटी ॲकॅडमी प्रा. लि. कंपनीला दिले आहे. या कंपनीला शासनाकडून प्रत्येक तरूणाच्या प्रशिक्षणासाठी सुमारे १४ ते १६ हजार रूपयांचा खर्च दिला जातो. या कंपनीने हे काम करिअर डिझायनर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिले आहे. करिअर डिझायनर कंपनीने आतापर्यंत २०६ बेरोजगार तरूणांना नाशिक जिल्हयातील सटाणा येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले आहे.दरम्यान, या कामासाठी करिअर डिझायनर कंपनीचे चार लाख रूपये खर्च झाले. हे बील कंपनीने टॉप्स ग्रुपकडे धाडून पैशांची मागणी केली. मात्र बील पास करण्यासाठी टॉप्स ग्रुप कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुरेश तनेजा यांनी १ लाख ५६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र करिअर डिझायनर कंपनीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली. प्राथमिक चौकशीत तनेजा यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झालयाने त्यांच्याविरेाधात एसीबीने गुन्हा नोंदविला. तसेच आरे कॉलनीत त्यांच्यासाठी सापळा रचला. त्यात तनेजा ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडले.