शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकांविरोधात नेटकऱ्यांचा टिष्ट्वटरवर संताप

By admin | Updated: July 5, 2017 04:54 IST

बँकेतील प्रत्येक व्यवहार अथवा सेवेवर शुल्क आकारण्याच्या बँकांच्या धोरणावर आज नेटकऱ्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. अनेक बँकांनी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बँकेतील प्रत्येक व्यवहार अथवा सेवेवर शुल्क आकारण्याच्या बँकांच्या धोरणावर आज नेटकऱ्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. अनेक बँकांनी सध्या विविध अटी आणि नियम लादण्याचा सपाटा लावला आहे. एटीएमच्या वापरापासून खात्यात रोख रक्कम जमा करण्यावरही मर्यादा टाकत दंड आकारणीचा अजब कारभार चालविला आहे. बँकांच्या या मनमानी कारभाराविरोधात मुंबई काँग्रेस आणि मनी लाइफ फाउंडेशनने मंगळवारी ‘बँक से बचाओ’ या हॅशटॅगने टिष्ट्वटरवर मोर्चा काढला.मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि मनी लाइफ फाउंडेशनच्या विश्वस्त सुचेता दलाल यांच्या पुढाकाराने मंगळवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथून टिष्ट्वट मोर्चाला सुरुवात करण्यात आली. ‘बँक से बचाओ’ असा हॅशटॅग वापरत बँकांच्या जाचक अटी आणि दंडाच्या नावाखाली पैसे उकळण्याचा जो उद्योग बँकांनी चालविला आहे त्यावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना टॅग करत बँकांच्या जाचक अटीतून सुटका करण्याची मागणी केली. बँकांविरोधात सुरू झालेले हे अनोखे आंदोलन काही काळ टिष्ट्वटर ट्रेंडिंगमध्येही होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक इस्रायल दौऱ्याला सुरुवात होईपर्यंत ‘बँक से बचाओ’ हे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होते. सामान्य ग्राहकांना धरले वेठीलापाच हजारपेक्षा कमी रक्कम खात्यात असेल तर दंड, तीनपेक्षा जास्त ट्रँजॅक्शन्स झाल्यास दंड, आपल्याच खात्यात दीड लाखापेक्षा जास्त पैसे भरायचे असतील तरीही दंड, असा बँकांचा अजब कारभार सुरू आहे. मोठ्या उद्योजकांनी हजारो कोटींची कर्जे बुडवली आहेत. त्याच्या भरपाईसाठी सामान्य ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. जास्तीत जास्त दंड आकारून शोषण सुरू आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी टिष्ट्वटरवर सक्रिय असतात. बँकेच्या दंडआकारणीमुळे त्रस्त झालेल्या जनतेने टिष्ट्वटरच्या माध्यमातून आपला रोष प्रकट करावा यासाठीच टिष्ट्वटर मोर्चा काढला होता. या अभियानाला देशभरातून चांगला प्रतिसाद लाभला. लोकांनी आपल्या व्यथा मांडल्याचे निरुपम यांनी सांगितले.