मेडिकलमध्ये निवासी डॉक्टरांचा संप

By Admin | Updated: June 18, 2014 01:27 IST2014-06-18T01:27:00+5:302014-06-18T01:27:00+5:30

योग्य उपचार करीत नसल्याच्या कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घालून मारहाण केली. ही घटना १६ जून रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास मेडिकलमध्ये घडली.

Researchers reside in medical | मेडिकलमध्ये निवासी डॉक्टरांचा संप

मेडिकलमध्ये निवासी डॉक्टरांचा संप

नागपूर : योग्य उपचार करीत नसल्याच्या कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घालून मारहाण केली. ही घटना १६ जून रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास मेडिकलमध्ये घडली. या घटनेने संतप्त झालेल्या मार्डच्या निवासी डॉक्टरांनी मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. याचा फटका रुग्णसेवेवर पडला असून अनेक शस्त्रक्रि या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
झायदा बी रा. सावंगी वर्धा असे महिला रुग्णाचे नाव आहे. झायदा यांच्या पोटात पाणी जमा झाल्याने त्यांना सोमवारी सकाळी मेडिकलच्या वॉर्ड २७ मध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले होते. दुपारी ४ वाजता डॉ. अमित बाहेती कर्तव्यावर होते. झायदा यांच्या नातेवाईकांनी डॉ. बाहेती यांच्याकडे रुग्णाच्या प्रकृतिविषयी चर्चा केली. डॉ. बाहेती यांनी, जेवढे शक्य आहे तेवढे उपचार सुरू असल्याचे सांगितले.
याशिवाय सर्जरी डॉक्टरांकडून रुग्णाची तपासणी झाल्यानंतर पुढील उपचाराची दिशा ठरेल, असेही ते म्हणाले. परंतु रुग्णाच्या नातेवाईकांनी, ‘रुग्णाला तुम्ही खाऊ घातले नाही. लक्ष देत नाही’ असे बोलून डॉ. बाहेती यांच्याशी हुज्जत घातली. वाद वाढत गेला आणि नातेवाईकांनी डॉ. बाहेती यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. डॉ. बाहेती यांना मारहाण झाल्याची वार्ता मेडिकलमध्ये पसरताच निवासी डॉक्टरांनी एकच गर्दी केली. डॉक्टरांनी रात्री रुग्णसेवा सुरू ठेवली, पण, सकाळपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सकाळी ८ वाजेपासून मेडिकलमधील ३०० च्यावर डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले.

Web Title: Researchers reside in medical