शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
13
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
14
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
15
‘डोंट यू अंडरस्टँड? गेट आउट फ्रॉम हिअर!’ रस्ता मोकळा करा! ‘जेन-झी’ने हातात घेतलेले नवे शस्त्र
16
‘अमेरिकन ड्रीम’चा पोपट मेला असे म्हणायचे का?; भारताला बसणार सर्वाधिक फटका, कारण...
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 09:34 IST

युवराज यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अहिल्यानगर -  जीवनात श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीतीलसाईबाबांचे देश-विदेशात कोट्यवधी भक्त आहेत. मात्र तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंदू सेनेचे संत युवराज यांनी साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. देशभरातील मंदिरातून साईंची मूर्ती हटवा या युवराज यांच्या विधानामुळे साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिर्डीत या प्रकरणी युवराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकांनी केली आहे. 

युवराज यांनी अलीकडेच साईबाबांबाबत वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला. त्यात ते म्हणाले की, काही मंदिरांमध्ये आजही साईबाबांच्या मूर्ती आहेत. ठिकठिकाणी साईबाबांची मंदिरे आहेत. सगळीकडे गल्ली-गल्लीत साईंची मंदिरे आहेत. हिंदूंना काय झाले माहिती नाही पण या सर्व मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवा. साईबाबांच्या मूर्ती तोडून त्या गटारात टाका. नदीमध्ये मूर्ती टाकून ती परत मिळेल असं करू नका. प्रत्येक मंदिरातून ही मूर्ती हटवा. जर मूर्ती हटवल्या नाहीत तर आम्ही जबरदस्तीने या हटवू. फरिदाबादमधून हे सुरू होईल. साईबाबा मुस्लीम होते, मासांहारी आणि व्यभिचारी होते असं संतापजनक विधान युवराज यांनी केले आहे. 

युवराज यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानकडून शिर्डी पोलीस ठाण्यात यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईबाबांची बदनामी केल्याप्रकरणी युवराज यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी साईभक्त करत आहेत. याआधीही सनातन रक्षक दलाकडून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे काही मंदिरात साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली होती. अयोध्येच्या हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनीही साईबाबा हे धर्मगुरू, महापुरुष, पीर, अवलिया होऊ शकतात. पण ते देव, ईश्वर असू शकत नाहीत. सनातनी मंडळींनी सर्व मंदिरातून चांदपीर  म्हणजे साईबाबा यांच्या मूर्ती हटविल्या पाहिजेत असं विधान केले होते. 

दरम्यान, नुकत्याच व्हायरल संत युवराज व्हिडिओमुळे साईभक्तांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानकडे युवराजवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तर शिर्डी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात आल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. साईबाबा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातील भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांवर अशी टीका करणे म्हणजे समाजात शांतता भंग करण्यासारखे आहे. त्यामुळे या दोषीवर योग्य कारवाई करावी असं साईभक्त, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकाकडून प्रशासनावर दबाव टाकला जात आहे. 

टॅग्स :saibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिरshirdiशिर्डी