शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

...तर निर्मला सितारामन यांना पदावरुन दूर करा : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 17:59 IST

अर्थमंत्री सक्षमपणे काम करत नसतील तर त्यांना निलंबीत करा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

पुणे : अर्थव्यवस्थेसंदर्भातल्या अनेक बैठकांना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी निर्मला सितारामन यांना बाेलवले नाही. अर्थ मंत्रालयाच्या बैठका पंतप्रधान घेत आहेत. अर्थमंत्र्याला बैठकांना न बाेलवणे हा त्यांचा अपमान आहे. त्यामुळे निर्मला सितारामन यांचे काम समाधानकारक नसेल तर त्यांना त्यांच्या पदावरुन दूर करण्यात यावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. या परिषदेत चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धाेरणांवर जाेरदार टीका केली. चव्हाण म्हणाले, 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचा अर्थ संकल्प मांडला जाईल. देशाची आर्थिक स्थिती पाहता हा महत्वाचा आहे. या अर्थसंकल्पात महत्वाचे निर्णय घेतले गेले नाही तर सध्याच्या मंदीमध्ये बदल होईल असे वाटत नाही. 

शिवसेनेने दिलेल्या प्रस्थावाच्या वक्तव्यावर मी ठाम : पृथ्वीराज चव्हाण

अर्थ मंत्रालयाच्या बैठका अर्थमंत्री नाहीतर पंतप्रधान घेत आहेत. या बैठकीला अर्थमंत्र्यांना निमंत्रण दिले जात नाही. पंतप्रधानांनी मोठ्या व्यावसायिकांना बोलवले त्या बैठकीला अर्थमंत्री नव्हत्या. अर्थ मंत्रालयाच्या 15 बैठक झाल्या त्यातल्या अनेक बैठकांना निर्मला सीतारामन यांना बोलावले नाही. अर्थ मंत्रालयाची सर्व सूत्रे पंतप्रधानांनी आपल्या हाती घेतली आहेत. संसदेत बजेट काेण सादर करेल हाही एक प्रश्न आहे. सीतारामन यांनी जरी बजेट सादर केले तरी ते बजेट माेदींचे बजेट असेल.  

नाईट लाईफचा प्रयाेग मुंबईत यशस्वी झाल तर पुण्यात मुंबईकरीता नाईट लाईफचे धाेरण राबविण्याचा विचार पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे करत आहेत. हा प्रयाेग सुरुवातीला मुंबईतील काही भागांमध्ये राबविण्यात येईल. तेथे ताे यशस्वी झाल्यास पुण्याचा विचार करु असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदी