शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भाबाबत संभ्रम दूर करा

By admin | Updated: October 9, 2014 01:07 IST

मोदी यांनी प्रचार सभेत मांडलेली अखंड महाराष्ट्राची भूमिका आणि भाजपच्या जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला बगल देण्याचे प्राप्त झालेले संकेत यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून

गडकरी, फडणवीसांचे मोदींना साकडे : दोन दिवसात मार्ग काढणारनागपूर : मोदी यांनी प्रचार सभेत मांडलेली अखंड महाराष्ट्राची भूमिका आणि भाजपच्या जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला बगल देण्याचे प्राप्त झालेले संकेत यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ भूमिका घेणारे विदर्भातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करावा,अशी विनंती पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. गुरुवारी पुन्हा याच मुद्यावर ते मोदींशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.भारतीय जनता पक्ष विशेषत: या पक्षातील विदर्भातील सर्वच वरिष्ठ नेत्यांनी सुरुवातीपासूनच स्वतंत्र विदर्भ राज्याचे जाहीर समर्थन केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर सभांमधून ही बाब अधोरेखितही केली आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने याच मुद्यावर भाजपला खिंडीत पकडून भाजप महाराष्ट्राचे तुकडे करणार, असा प्रचार सुरू केला आहे. त्याला प्रतिउत्तर म्हणून मोदींनी अखंड महाराष्ट्राची भूमिका मांडली. त्यामुळे विदर्भातील भाजप नेते, पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्तेसुद्धा संभ्रमात पडले आहेत. विदर्भाच्या मुद्यावर जनतेला तोंड कसे द्यायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. मोदींची मांडलेली अखंड महाराष्ट्राची भूमिका ही मुंबईच्या संदर्भात होती. पक्ष आजही छोट्या राज्याच्या मागणीवर ठाम आहे, असे सांगण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात असला तरी तो प्रभावी ठरत नाही. विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा आहेत आणि स्वबळावर सत्तेत येण्यासाठी त्या महत्त्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र राज्याच्या मुद्यावर मध्यम मार्ग काढून निर्माण झालेला संभ्रम दूर होणे महत्त्वाचे आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. ती ओळखूनच गडकरी-फडणवीस यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली व यातून मार्ग काढण्याची विनंती केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये आले असता त्यांनाही याबाबत साकडे घालण्यात आले. गुरुवारी ९ आॅक्टोबरला रात्री मोदी पुन्हा नागपूरमध्ये येत आहेत. त्यांचा येथे मुक्काम आहे. या काळात उभय नेते त्यांची भेट घेऊन या मुद्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. (प्रतिनिधी)असा आहे पंतप्रधानांचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी ९ तारखेला रात्री १०.२५ वा. मुंबईहून विमानाने नागपूर विमानतळावर आगमन होईल. रात्री १०.४५ वा. ते राजभवनावर पोहचतील. तेथे त्यांचा मुक्काम आहे. १० आॅक्टोबरला सकाळी ९.१० मिनिटाने विमानतळाकडे रवाना होतील. तेथून ते ब्रम्हपुरी येथे प्रचारसभेसाठी जातील.