शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘रेमडेसिविर’चा संबंध मृत्यू राेखण्याशी नाही - टास्क फोर्स; काेराेना रुग्णांसाठी इंजेक्शन खरेदीस गर्दी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 05:23 IST

coronavirus news : २-३ दिवसांनी कमी करण्यास मदत होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या यासंदर्भात निर्माण झालेली स्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत ही निर्यात बंद राहील, असा आदेश केंद्र सरकारने सर्व संबंधित औषध कंपन्यांना दिला आहे. 

मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनचा कोविड रुग्णांचा मृत्यू राेखण्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊन इंजेक्शनच्या खरेदीसाठी गर्दी करू नये, असा सल्ला कोरोना टास्क फोर्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. या इंजेक्शनचा वापर हेपेटायटिसच्या उपचार प्रक्रियेत केला जायचा, त्यानंतर इबोलावर उपचार करण्यासाठी वापरले जायचे. मात्र या इंजेक्शनमुळे मृत्यू टाळण्यास उपयोग होत नसून केवळ काेराेनाबाधित  रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी २-३ दिवसांनी कमी करण्यास मदत होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.सध्या यासंदर्भात निर्माण झालेली स्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत ही निर्यात बंद राहील, असा आदेश केंद्र सरकारने सर्व संबंधित औषध कंपन्यांना दिला आहे. इंजेक्शन ‘लाइफ सेव्हिंग’ औषधात येत नाही!- रेमडेसिविर इंजेक्शन बाजारात उपलब्ध न झाल्यास नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, ते ‘लाइफ सेव्हिंग’ औषधात येत नाही. या इंजेक्शनमुळे संसर्गाचे विस्तार रोखण्यास मदत होते, मात्र मृत्यू कमी करण्यासंदर्भात हे इंजेक्शन उपयुक्त नाही. जागतिक स्तरावरही अशा संदर्भातील कोणताही संशोधन अहवाल नाही. - रेमडेसिविरमुळे रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी कमी होतो, त्यामुळे दुसऱ्याला खाट मिळणे सोपे होते. या इंजेक्शनला दुसऱ्या अँटीव्हायरल औषध इंजेक्शनचाही पर्याय आहे. हे इंजेक्शनही संसर्गाच्या सुरुवातीच्या ५-६ दिवसांत दिल्यास परिणामकारक आहे. त्यामुळे या पर्यायाचाही वैद्यकीय तज्ज्ञांनी विचार करावा, अशी माहिती कोरोना टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी दिली.

साठ्याची माहिती द्यावीरेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपल्या पुरवठादार आणि डिस्ट्रिब्युटर्सकडी साठ्याची माहिती द्यावी लागेल. तसेच औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी औषध निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जाऊन औषधाच्या साठ्याबाबात कंपन्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी कऱण्याचे निर्देश दिले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस