शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय सेवेतील चारित्र्याची व्याख्या जारी

By admin | Updated: August 28, 2014 03:31 IST

शासकीय सेवेत नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना बुधवारी सामान्य प्रशासन विभागाने जारी केल्या

मुंबई : शासकीय सेवेत नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना बुधवारी सामान्य प्रशासन विभागाने जारी केल्या. जे दिवाणी गुन्हे किरकोळ स्वरूपाचे आहेत व त्यात न्यायालयात रीतसर खटला चालून २ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा किरकोळ स्वरूपाची शिक्षा झाली आहे, अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल. दिवाणी स्वरूपाचे जे गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत वा अशा उमेदवारांविरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारी दिवाणी स्वरूपाच्या असल्यास ज्या गुन्ह्यांसाठी संभाव्य दंडाची कमाल मर्यादा २ हजार रुपयांपेक्षा जास्त नसेल किंवा किरकोळ स्वरूपाची शिक्षा असेल तर अशा उमेदवारांनाही नियुक्ती दिली जाईल. फौजदारी गुन्ह्यांसंदर्भात मात्र कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वा प्राप्त झालेल्या तक्रारी फौजदारी स्वरूपाच्या असतील तर अशा उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती दिली जाणार नाही. शासकीय, निमशासकीय कार्यालये, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, शासकीय अनुदानप्राप्त संस्था, विद्यापीठे, सहकारी संस्था, शासकीय उपक्रम, महामंडळे आणि मंडळांसाठी या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. विविध पदांवरील नियुक्ती देताना सक्षम प्राधिकाऱ्याला निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी दोन समित्या नियुक्त करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. (विशेष प्रतिनिधी)