शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंसह १६ पक्षांची नोंदणी रद्द

By admin | Updated: September 30, 2015 02:44 IST

निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या राज्यातील १६ पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यात खा.रामदास आठवले यांचा रिपाइं, खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचा समावेश आहे.

मुंबई : निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या राज्यातील १६ पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यात खा.रामदास आठवले यांचा रिपाइं, खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचा समावेश आहे. सर्व राजकीय पक्षांना दरवर्षी लेखापरीक्षण आणि आयकर रिटर्न्स भरल्याचा दाखला निवडणूक आयोगाला सादर करणे अनिवार्य असते. मात्र, या व अन्य काही कागदपत्रांची पूर्तता न केल्याने आयोगाने विविध पक्षांना नोटीस बजावली होती. कागदपत्रांची पूर्तता मुदतीत न केलेल्या १६ पक्षांची नोंदणी आयोगाने रद्द ठरविली. त्यामुळे आमदार कपिल पाटील यांचा लोकभारती पक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्षावरही नोंदणी रद्द होण्याची नामुष्की ओढावली आहे. या पक्षांना आता अपक्ष म्हणून लढावे लागेल. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, बसपा आणि मनसेला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता आहे. अन्य पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे झालेली आहे. (विशेष प्रतिनिधी)---------------मान्यता रद्द झालेले पक्ष : लोकभारती, खा.आठवलेंचा रिपाइं, स्वाभिमानी पक्ष, जनसुराज्य शक्ती, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया डेमॉक्रॅटिक, खोरिपा, जनशक्ती आघाडी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस, शिवराज्य पक्ष, सत्यशोधक समाज पक्ष, राष्ट्रवादी जनता पार्टी, मागासवर्गीय जनशक्ती पार्टी, इंडियन मुस्लिम काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष, आॅल इंडिया क्रांतिकारी काँग्रेस.-------------नोटीसीशिवाय कारवाईनिवडणूक आयोगाने कोणतीही नोटीस न देता आमच्या पक्षाची नोंदणी रद्द केली याचे आश्चर्य वाटले. आज आयोगात जाऊन तांत्रिक बाबींची पूर्तता आम्ही केली आहे. त्यामुळे नोंदणी नक्कीच परत मिळेल याचा विश्वास वाटतो. राज्य निवडणूक आयोग केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी संबंधित असते. - आ.कपिल पाटील, लोकभारती