शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 20:34 IST

Amravati : राज्य शासनाने कोरोना संकटातून काहीअंशी मुक्तता मिळावी, यासाठी आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना १२ ऑगस्ट २०२० रोजी मंत्रिमंडळात लागू केली.

- गणेश वासनिक

अमरावती : आदिवासी समाजासाठी मंजूर केलेल्या खावटी अनुदान योजनेसाठी आता पोर्टलवर नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. त्याकरिता ‘ट्रायबल’ने स्वतंत्र पोर्टल विकसित केले असून, नोंदणीशिवाय अनुदान नाही, अशी नवी नियमावली आहे. मात्र, खावटी अनुदानासाठी लाभार्थी जास्त आणि लक्ष्यांक कमी असल्यामुळे आदिवासी विकास विभागासमोर पेच निर्माण झाला आहे.

राज्य शासनाने कोरोना संकटातून काहीअंशी मुक्तता मिळावी, यासाठी आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना १२ ऑगस्ट २०२० रोजी मंत्रिमंडळात लागू केली. यासंदर्भात ९ सप्टेंबर रोजी शासनादेश निर्गमित झाला, तर या योजनेप्रभावी अंमलबजवाणीसाठी ३० सप्टेंबर रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मात्र, या योजनेत सातत्याने बदल होत असल्याने खावटी अनुदान मिळणार की नाही?

याबाबत आदिवासी समाजात संभ्रम कायम आहे. खावटीचे दोन हजार रुपये आदिवासींना खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्प स्तरावर आदिवासींनी खावटीसाठी दिलेल्या अर्जाचा आधार घेत पात्र लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरावी लागणार आहे, यात जनगणेची आकडेवारी, मनरेगा लाभार्थी, आदिम जमात, पारधी व वैयक्तिक वनहक्कधारक अशा पाच प्रकारच्या लाभार्थ्यांना ‘खावटी’चा लाभ मिळणार आहे. यात दोन हजार रुपये खात्यात आणि दोन हजारांच्या जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळणार आहे. त्याअनुषंगाने समिती गठित करण्यात आली आहे.

पात्र लाभार्थी संख्येत वाढ, प्रशासन हैराणकोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाला सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. परंतु, लाभार्थी संख्येचा लक्ष्यांक मर्यादित असल्याने अमरावती, नाशिक, ठाणे व नागपूर अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत पात्र लाभार्थी निश्चित करणे प्रशासनासाठी तारेवरची कसरत ठरत आहे. राज्यभरात खावटीचे ११ लाख ५५ हजार आदिवासी लाभार्थी निश्चित करण्यात आले असले तरी २५ लाखांच्यावर लाभार्थी असल्याची माहिती आहे. त्यामुळे खावटी अनुदानावरून वादाची ठिणगी उडण्याचे संकेत आहे.

अमरावती विभागांतर्गत पांढरकवडा, धारणी व किनवट प्रकल्प स्तरावर ४ लाखांच्यावर खावटी अनुदानाचे लाभार्थी आहेत. शासनाने १.९० लाख लाभार्थी लक्ष्यांक दिले असून, आतापर्यंत ५३ हजार पात्र उमेदवारांची पोर्टलवर नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्यात दोन हजार रुपये खात्यात जमा होतील. लाभार्थी संख्येत वाढ करण्यासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.- विनोद पाटील, अपर आयुक्त, ‘ट्रायबल’ अमरावती. 

टॅग्स :Amravatiअमरावती