शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती पोलीस काढणार आरोपीची रेड कॉर्नर नोटीस

By admin | Updated: June 19, 2014 00:54 IST

पैसे दुप्पट करुन देण्याचे प्रलोभन देऊन अमरावतीकरांना कोट्यवधी रुपयांनी गंडविणाऱ्या श्रीसूर्या समूहाचा एजंट प्रकाश ज्ञामदेव राऊत (५५,रा. दीपनगर, अमरावती) हा सिंगापूरला पसार झाला.

पोलीस सिंगापूरला जाणार : श्रीसूर्या फसवणूक प्रकरण अमरावती : पैसे दुप्पट करुन देण्याचे प्रलोभन देऊन अमरावतीकरांना कोट्यवधी रुपयांनी गंडविणाऱ्या श्रीसूर्या समूहाचा एजंट प्रकाश ज्ञामदेव राऊत (५५,रा. दीपनगर, अमरावती) हा सिंगापूरला पसार झाला. या आरोपीला पकडण्यासाठी अमरावती पोलीस केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना (इंटरपोल) ला पत्रव्यवहार करुन रेड कॉर्नर नोटीस (आंतरराष्ट्रीय स्तरावर फरार असणाऱ्या आरोपींची शोधपत्रिका) काढणार आहे. त्यानंतर आरोपी राऊतला पकडण्यासाठी पोलीस सिंगापूर येथे जाणार आहेत.श्रीसूर्या समूहाचे मुख्य सूत्रधार समीर जोशी व पल्लवी जोशी यांनी एजंटांचे जाळे सर्वत्र पसरवून पैसे दुप्पट करुन देण्याचे प्रलोभन दिले आणि नागरिकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविले. याप्रकरणी जोशी दाम्पत्यांसह श्रीसूर्याच्या एजंटांविरुद्ध नागपूर, अमरावती, पुणे व अकोला पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी अमरावती पोलिसांनी समीर जोशी, पल्लवी जोशी, मोहन पितळे, मुकुंद पितळे, नितीन केसकर, अंजली काशीकर, शंतनू कुऱ्हेकर यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केलीे. आरोपी अंजली काशीकर यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. उर्वरित आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपी प्रकाश राऊत व आनंद जहांगीरदार हे घटनेच्या दिवसापासून पसार आहेत. आरोपी प्रकाश हा सिंगापूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याला पकडण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरु केल्या आहेत. सिंगापूर येथील त्याचे ‘लोकेशन’ मिळवून त्याला अटक करण्यासाठी पोलीस सीबीआयमार्फत इंटरपोलला पत्रव्यवहार व रेड कॉर्नर नोटीस बजावणार आहे. इंटरपोल सीबीआयमार्फत आरोेपीचे लोकेशन अमरावती पोलिसांना देणार आहेत. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार करुन विशेष न्यायालयातून आरोपी राऊत याचा स्टँडींग वॉरंट पोलीस काढणार आहे. हा वॉरंट काढल्यावर तात्पुरत्या स्वरुपात पोलीस सिंगापूरचा व्हिसा पासपोर्ट तयार करुन आरोपीला पकडण्यासाठी सिंगापूर येथे जाणार आहे. आरोपीला अटक केल्यानंतर तेथील न्यायालयात हजर करुन पोलीस त्याला अमरावतीत आणणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.