शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅम्बी व्हॅली विकून पैशांची वसुली करू’

By admin | Updated: March 22, 2017 02:25 IST

सहारा उद्योग समुहाने गुंतवणूकदारांना अजूनही परत न केलेल्या एकूण १४ हजार कोटी रुपयांपैकी पाच हजार कोटी रुपये येत्या

नवी दिल्ली : सहारा उद्योग समुहाने गुंतवणूकदारांना अजूनही परत न केलेल्या एकूण १४ हजार कोटी रुपयांपैकी पाच हजार कोटी रुपये येत्या १७ एप्रिलपर्यंत न भरल्यास या कंपनीच्या मालकीच्या पुणे जिल्ह्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव पुकारण्याचा आदेश दिला जाईल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.गुंतवणूकदारांच्या पैशांची परतफेड सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाने ४० हजार कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या सहाराच्या अ‍ॅम्बी व्हॅलीवर टांच आणण्याचा आदेश गेल्या महिन्यात दिला होता. कंपनीकडून पैसे उभे केले जाण्याची काही चिन्हे दिसत नाहीत, असे ‘सेबी’ने निदर्शनास आणल्यावर न्या. दीपक मिश्रा, न्या. रंजन गोगोई व न्या. ए. के. सिक्री यांचे खंडपीठ म्हणाले की, कंपनीने १७ एप्रिलपर्यंत पाच हजार कोटी रुपयांची व्यवस्था न केल्यास अ‍ॅम्बी व्हॅली विकून पैसे वसूल करण्याचा आदेश द्यावा लागेल. सहारा रिअल इस्टेट आणि सहारा हाऊसिंग या सहारा समुहातील दोन कंपन्यांनी बेकायदा योजना राबवून तीन कोटी गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे त्यांना परत करण्यासाठी सहारा समुहाने २५ हजार कोटी रुपये ‘सेबी’कडे जमा करावेत, असा आदेश न्यायालयाने आॅगस्ट २०१२ मध्ये दिला होता. तेव्हापासून सहाराने फक्त ११ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. त्यापैकी सहा हजार कोटी रुपये न्यायालयाने सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रत रॉय व दोन संचालकांना ४ मार्च २०१४ रोजी तुरुंगात पाठविल्यानंतर भरले गेले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)