शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख पासपोर्टचे विक्रमी वितरण

By admin | Updated: January 1, 2015 00:52 IST

जानेवरी ते डिसेंबर २०१४ या कालावधीमध्ये २ लाख ९ हजार ६०४ पासपोर्टचे वितरण करून विक्रमी कामगिरी नोंदविली आहे.

दीपक जाधव - पुणेपासपोर्ट मिळण्यामध्ये असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असल्याने वर्षभरापूर्वी टीकेचे लक्ष्य ठरलेल्या पुणे पासपोर्ट कार्यालयाने दर महिन्याला विशेष मेळाव्याचे आयोजन, अपॉइंटमेंटच्या संख्येत वाढ, तक्रारींचे तातडीने निराकरण आदी उपाययोजना राबविल्या. त्यामुळे जानेवरी ते डिसेंबर २०१४ या कालावधीमध्ये २ लाख ९ हजार ६०४ पासपोर्टचे वितरण करून विक्रमी कामगिरी नोंदविली आहे.पुणे पासपोर्ट विभागांतर्गत पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर या ६ जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे शहरासह इतर सहाही जिल्ह्यांमधून पासपोर्ट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. पुणे विभागातून २००५ मध्ये ६८ हजार पासपोर्ट वितरित करण्यात आले होते. त्यानंतर २०१३ पर्यंत त्यामध्ये दर वर्षी १० ते १५ हजारांची वाढ होत होती. मात्र, २०१३ ते २०१४ या दोन वर्षांत पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ५० हजारांनी वाढ झाली आहे. पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया संपूर्णपणे आॅनलाइन करण्यात आली आहे. पासपोर्ट हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नागरिकत्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे त्याकरिता केल्या जाणाऱ्या अर्जातील माहिती अत्यंत काटेकोरपद्धतीने भरणे आवश्यक असते; तसेच यासाठी पुरावा म्हणून सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांची पडताळणीही अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी, या प्रक्रियेमध्ये अनेक सुधारणा राबविण्यास सुरूवात केली. अपॉइंटमेंट मिळत नसल्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी महिन्यातून दोन वेळा विशेष मेळावे भरविण्यात येऊ लागले. दररोज सर्वसाधारण एक हजार, तर तत्काळच्या ११० अपॉइंटमेंट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर दोन महिने पुढची अपॉइंटमेंट दिली जायची, आता ते अंतर एक महिन्यापर्यंत कमी झाले आहे. च्पासपोर्टची मुदत संपल्यानंतर नूतनीकरणासाठी अर्ज केल्यास त्याच दिवशी कागदपत्रांची पडताळणी करून पासपोर्टची छपाई केली जाते. त्यानंतर तुमचा पासपोर्ट पोस्टाने घरी पाठविण्यात आल्याचा मेसेज अर्जदाराच्या मोबाईलवर पाठविला जात आहे. च्पासपोर्ट अर्जधारकांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर लगेच पासपोर्टची छपाई करून ते घरपोच पाठविले जात आहेत. सध्या प्रिटिंगअभावी एकही अर्ज प्रलंबित नसल्याची माहिती प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली. पूर्वी तक्रारींनी भरला जाणारा ईमेल बॉक्सवर कौतुकाचे तसेच आभाराचे मेसेज येत असल्याचे गोतसुर्वे यांनी सांगितले. २००५६८०४४२००६९४२४३२००७१०७९५५२००८१२०७८६२००९११३२५९२०१०१२९५१४२०१११४११८४२०१२१४६७५६२०१३१७८४७६२०१४२०९६०४