शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर लागले ‘भाव’ खायला

By admin | Updated: October 1, 2014 00:22 IST

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर अचानक भाजपा व शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली.

पुणो : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर अचानक भाजपा व शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे विधानसभेसाठी अनेक इच्छुकांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. अटीतटीची निवडणूक असल्याने अपक्ष उमेदवारांचे माघारीसाठी ‘भाव’ वधारले आहेत. पक्षाच्या मोठय़ा नेत्यांचा फोन आला पाहिजे, निवडणुकीच्या तयारीचा खर्च निघाला पाहिजे; अन्यथा ठोस आश्वासनाशिवाय माघारी न घेण्याची अपेक्षा उमेदवारांना आहे. 
यंदा पहिल्यांदाच शहरातील आठही मतदारसंघांत पंचरंगी निवडणूक होत आहे. प्रत्येक मतदारसंघात अनेक बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार दोन दिवसांपासून संबंधितांची समजूत काढण्यावर भर देत आहेत. त्यानंतर प्रमुख पक्षाचे शहराध्यक्ष व पदाधिकारी यांच्याकडूनही बंडखोरी शमविण्यासाठी बैठका सुरू आहेत. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच अपक्ष  बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, माघारीचा दिवस जवळ आल्याने अपक्ष उमेदवारांचा भाव वाढत चालला आहे. काँग्रेसमधील शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड व हडपसर मतदार संघासह सर्वच मतदारसंघांत बंडखोरांना शांत करण्याचे प्रमुख पक्षांचे शहराध्यक्ष यांचे काम 
सुरू आहे. उद्या दुपारी 3 र्पयत 
बंडखोरी मिटविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होतील. (प्रतिनिधी)
 
च्राज्यात पंचरंगी लढतीमुळे कोणाची सत्ता येणार, हे अनिश्चित असल्यामुळे प्रत्येक इच्छुकाला आमदार होण्याची आशा आहे. परंतु, पक्षातून एकाच इच्छुकाला उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणा:यांना विधान परिषदेच्या आश्वासनांचे वेध लागले आहेत.