शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे होणार राज्यातील व्याघ्रगणना

By admin | Updated: May 2, 2015 01:02 IST

देशात आणि राज्यांत वाघांची संख्या किती? यासंदर्भात असलेला घोळ आता अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग प्रणालीमुळे संपुष्टात आला आहे.

गणेश वासनिक, अमरावतीदेशात आणि राज्यांत वाघांची संख्या किती? यासंदर्भात असलेला घोळ आता अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग प्रणालीमुळे संपुष्टात आला आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे वाघांची प्रगणना करण्यास मदत मिळत असल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बुद्धपौर्णिमेला व्याघ्रगणना केली जाणार आहे.व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, पाणवठ्यावरील अस्तित्व व वनविभागाने विहित केलेल्या पद्धतीने २०१० ते २०१४ या दरम्यान व्याघ्र गणनेला सुरुवात करण्यात आली. नवीन पद्धतीनुसार कॅमेरा ट्रॅपिंग, नवतंत्रज्ञान प्रणाली वापरून देशभरातील वाघांची अचूक आकडेवारी निदर्शनास आली आहे. कॅमेरा ट्रॅपिंगमुळे वाघांसह अन्य वन्यप्राण्यांची गणना करणे सुकर झाले आहे. एका प्रकल्पातील वाघ दुसऱ्या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेत गेला तर ते या प्रणालीने सिद्ध करता येते. या अद्ययावत प्रणालीमुळे डेहरादून वन्यजीव संस्थेला सात वर्षांनी वाघांची संख्या निश्चित करणे शक्य झाले आहे. वाघांच्या पट्ट्यावरून वाघांची संख्या सहज स्पष्ट होऊ लागली आहे. वनविभागाने हे नवे तंत्रज्ञान शस्त्र म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. वाघांचे संरक्षण आणि शिकाऱ्यांवर नजर ठेवता येते. त्यामुळे वनविभागाने वनखंडानुसार महत्त्वाच्या जागी कॅमेरे बसविले आहेत. दर दोन ते तीन दिवसांनी तपासणी करून यात कैद झालेल्या वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे वनाधिकाऱ्यांना सुलभ झाले आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव बांध - नागझिरा या प्रमुख व्याघ्र प्रकल्पांमध्ये या प्रणालीचा उपयोग होऊ लागला आहे.