शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीचीच शिक्षा पाहिजे

By admin | Updated: September 14, 2016 00:32 IST

महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत. बलात्कार करणाऱ्या नराधमांना दयामाया दाखवता काम नये, त्यांना फाशीच शिक्षा दिली पाहिजे

भोसरी : महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत. बलात्कार करणाऱ्या नराधमांना दयामाया दाखवता काम नये, त्यांना फाशीच शिक्षा दिली पाहिजे, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भोसरी येथे व्यक्त केले. कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात भोसरी कला क्रीड़ा मंच आयोजित भोसरी महोत्सवात ते बोलत होते. या वेळी महापौर शकुंतला धराडे, अभिनेता सिद्धार्थ जाधव, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, संयोजक अ‍ॅड. नितीन लांडगे, इंद्रमन सिंह, नगरसेवक वसंत लोंढे, संजय वाबळे, नगरसेविका सुरेखा गव्हाणे, शुभांगी लोंढे, सुनंदा फुगे, भरत लांडगे, संदीप राक्षे, राजेंद्र सिंह, भाऊसाहेब डोळस आदी उपस्थित होते.सबनीस म्हणाले, ‘‘भोसरीने शहरपण स्वीकारताना अस्सल गावपणाचा बाज टिकवून ठेवला आहे, तसेच आध्यात्मिक, सांस्कृतिक क्रीडा क्षेत्राची परंपरा जोपासताना सर्व धर्मांचा व जातीचा एकात्मिक गौरव भोसरीने केल्याचा अभिमान आहे. बलात्काराच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या घटना मन पिळवटून टाकणाऱ्या आहेत.’’ आमदार लांडगे म्हणाले, ‘‘भोसरीतील नागरिकांचे उदंड प्रेम कायम मिळाले आहे, तसेच त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच ध्येय जोपसणार आहे.’’या वेळी विजय फुगे यांनी प्रास्ताविक केले. किरण लांडगे यांनी आभार मानले. (वार्ताहर)