शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रांगोळीतून बाल अत्याचारविरोधी मुद्रा

By admin | Updated: September 14, 2016 03:52 IST

गणरायाच्या वैभवशाली मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळीच्या माध्यमातून बाल अत्याचारविरोधी प्रबोधनाचा जागर होणार आहे.

पुणे : गणरायाच्या वैभवशाली मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळीच्या माध्यमातून बाल अत्याचारविरोधी प्रबोधनाचा जागर होणार आहे. विविध मार्गाने लहान मुला-मुलींवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांची मुद्रा रांगोळीतून मिरवणूक मार्गावर उमटेल. प्रबोधनाचा हा आगळावेगळा जागर प्रमुख विसर्जन मार्ग असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील ११ चौकांमध्ये पाहायला मिळेल.ढोलताशाचा गजर, आगळावेगळा थाट अन् परंपरेला साजेशा डौलात लक्ष्मी रस्त्याने निघणारी लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक जगभरात प्रसिद्ध आहे. देश-विदेशातून लाखो गणेशभक्त ही मिरवणूक ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी येत असतात; पण केवळ आकर्षक रथ, ढोलताशा पथकांचे वादन हेच या मिरवणूकमार्गावरील आकर्षण नसते, तर बाप्पाला नमन करण्यासाठी घालण्यात आलेल्या रांगोळ्यांच्या पायघड्याही लक्ष वेधून घेतात. त्यातही दर वर्षी एखादा सामाजिक विषय घेऊन त्याला प्रबोधनाची जोडही दिली जाते. राष्ट्रीय कला अकादमीचे कलाकार दर वर्षी लक्ष्मी रस्त्यावरील चौकाचौकांत आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रबोधनाचा जागर करतात. अकादमीने या वर्षी लहान मुला-मुलींवरील अत्याचाराविरोधात संदेश देणारा विषय हाताळला आहे. याविषयी माहिती देताना अकादमीचे अध्यक्ष मंदार रांजेकर म्हणाले, ‘‘लहान मुलांवर वेगवेगळ्या प्रकारे होणारा अन्याय-अत्याचार रांगोळीच्या माध्यमातून जगासमोर आणला जाणार आहे. घरांमध्ये आई-वडिलांकडून होणारी मारहाण, मुलींना दिला जाणारा दुजाभाव, बाल कामगारांवरील अन्याय, मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचार अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला जाणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील सर्व, ११ चौकांमध्ये या विषयांवर वेगवेगळी रांगोळी साकारण्यात येईल. त्यामध्ये मुला-मुलींच्या चित्रांसह सामाजिक संदेश असतील. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोरून सकाळी ८ वाजता उपेक्षित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रमुख तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरुवात होईल.